आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kriti Sanon's Upcoming Film 'Mimi' Will Be Based On Motherhood, Pankaj Tripathi And Kriti Will Be Back Together.

कृती सॅनॉनचा आगामी चित्रपट 'मिमी' असेल मातृत्वावर आधारित, पंकज त्रिपाठी आणि कृती पुन्हा येणार एकत्र 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : कृती सेनन आणि पंकज त्रिपाठी आगामी चित्रपट 'मिमी'मध्ये पुन्हा सोबत दिसतील. या चित्रपटाची घोषणा शुक्रवारी झाली. याचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करतील, तर दिनेश विजान याचे निर्माते आहेत. दोघांनीही यापूर्वी 'लुका छुपी'मध्ये सोबत काम केले आहे. तथापि, या चित्रपटाची कथा मातृत्वावर आधारित असेल. 'मिमी' मराठी चित्रपट 'मला आई व्हायचंय' यावर आधारित आहे. या चित्रपटाला 2011 साली सर्वश्रेष्ठ मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट सरोगसीवर आधारित आहे.  
 

    हे पोस्टर कृती सेननने ट्विटरवर रिलीज केले आहे. पोस्टर रिलीज करत कृतीने लिहिले, 'आयुष्य एक प्रवास आहे जो अप्रत्यक्ष चमत्कारांनी भरलेला आहे. या प्रवासासाठी तयार व्हा. 'मिमी', खूप विशेष होणार आहे.' 

बातम्या आणखी आहेत...