आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • KRK Claims 'Salman Khan Phoned And Asked Him To Help For 'Dabangg 3', He Earlier Said About Movie That It Is Super Flop

केआरकेचा दावा - सलमान खानने फोन करून 'दबंग 3' साठी मदत मागितली, यापूर्वी चित्रपटाला म्हणाला होता सुपरफ्लॉप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : फिल्म क्रिटिक आणि अभिनेता कमाल राशिद खानने दावा केला आहे की, सलमान खान त्याच्याकडे मदत मागत आहे. केआरकेनुसार सलमानने फोन करून 'दबंग 3' ला सपोर्ट करायला सांगितले. 'दबंग' सीरीजचा हा तिसरा चित्रपट 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटात सलमानव्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा आणि सई मांजरेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी कमालने 'दबंग 3' बद्दल भविष्यवाणी करत चित्रपट सुपरफ्लॉप असल्याचे भाकीत केले होते. एवढेच नाही त्याने चित्रपटाचे गाणे आणि ट्रेलरहीदेखील खूप निंदा केली होती. 

इंडस्ट्रीमध्ये वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेला कमाल खानने सांगितले की, सलमान खान आपला अपकमिंग चित्रपट 'दबंग 3' साठी त्याच्याकडे मदत मागत आहे. त्याने ट्वीट करून सांगितले, "काल रात्री मला सलमान खानने स्वतः फोन केला आणि 'दबंग 3' ला सपोर्ट करायला सांगितले. मी त्याला प्रॉमिस केले की, मी आता त्याच्याबद्दल कोणतेही ट्वीट करणार नाही आणि निष्पक्ष रिव्ह्यू देईन." एवढेच नाही पुढे अभिनेता म्हणाला की, 'सलमान भाऊ तुमच्या एका फोन कॉलने तुमच्याबद्दलचे माझे विचार बदलून टाकले. 'दबंग 3' साठी शुभेच्छा.'  

यापूर्वी चित्रपटाला म्हणाला होता सुपरफ्लॉप... 


चित्रपट समीक्षक कमालने सलमानचा चित्रपट 'दबंग3' बद्दल म्हणाले होते की, हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक गोळा करू शकणार नाही. केआरकेने चित्रपटातील गाणी आणि ट्रेलरदेखील एकदम वाईट असल्याचे म्हणाले होते. तो म्हणाला की, हा चित्रपट पाहण्यासाठी केवळ रिक्षावाले आणि टपोरी लोकच येतील. तो 'दबंग3' च्या कमाईबद्दल म्हणाला होता की, हा चित्रपट 150 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन करू शकणार नाही.