आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशुध्दावस्थेत केआरके दुबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल, स्टाफने सांगितले- प्लीज प्रार्थना करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. स्वतःला फिल्म क्रिटिक म्हणून घेणारा कमाल राशिद खान उर्फ केआरकेला दुबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याची माहिती त्याची वेबसाइट KRKBOXOFFICE च्या ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे. दुबई येथील घरात पडल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे असे बोलले जातेय. सध्या तो बेशुध्द आहे. त्याच्या स्टाफने ट्विटमध्ये लिहिले की, "दुखद समाचार... रात्री(गुरुवारी) केआरके आपल्या दुबई येथील घरात पडले आणि त्यांना दुबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, सध्या ते बेशुध्द आहेत. प्लीज त्यांच्यासाठी प्रार्थना करा." गुरुवारी केआरकेने अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा स्टारर 'नमस्ते इंग्लँड' चित्रपटाचा रिव्ह्यू केला होता.

 

एप्रिलमध्ये त्याला पोटाचा कँसर असल्याचे समोर आले 
- याचवर्षी एप्रिलमध्ये कमाल राशिद खुप चर्चेत आला होता. त्याने खुलासा केला होता की, त्याला पोटाचा कँसर आहे, तो फक्त एक-दोन वर्षेच जिवंत राहू शकेल. त्याने लिहिले होते की, "हे कंफर्म आहे की, मला तिस-या स्टेजचा स्टमक कँसर आहे. माझ्याजवळ फक्त 1-2 वर्षे टाइम आहे. आता मी कुणालाही एन्टटेन करणार नाही आणि मला कुणाची सहानुभुतीही नकोय. जे लोक मला अजुनही शिव्या देतील, तिरस्कार करतील आणि प्रेम करतील त्यांच्यावर मी प्रेम करतो."

 

- केआरकेने पुढे लिहिले होते की, "मला फक्त दोन गोष्टींचे दुःख राहिल की, पहिले म्हणजे- मला एक प्रोड्यूसर म्हणून खुप चांगला चित्रपट बनवायचा होता. दूसरे म्हणजे - मला अमिताभ बच्चन यांच्यासोबत फिल्म प्रोड्यूस करायची होती. आता माझ्यासोबत या दोन इच्छाही जगाला निरोप देतील. आता मला माझा उरलेला वेळ कुटूंबियांसोबत घालवायचा आहे." याच्या काही दिवसांनंतर एका दूस-या ट्विटमध्ये त्याने लिहिले होते की, त्याला फक्त फर्स्ट स्टेजचा कँसर आहे आणि तो काही दिवसा एकदम बरा होईल.

बातम्या आणखी आहेत...