आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kruti Sanon Will Be Seen Opposite To Akshay Kumar In The Upcoming Film 'Bachchan Pandey', A Hindi Remake Of The Tamil Film 'Veeram'.

आगामी 'बच्चन पांडे' चित्रपटात अक्षयच्या अपोजिट दिसणार आहे कृति, तामिळ चित्रपट 'वीरम' चा हिंदी रीमेक आहे चित्रपट 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अशातच अक्षय कुमारने साजिद नाडियाडवालाचा चित्रपट 'बच्चन पांडे' साइन केला आहे. आता ऐकण्यात आले आहे की, या चित्रपटासाठी मेकर्स कृति सेननच्या नावावर विचार करत आहेत. तिला या चित्रपटात अक्षयच्या अपोजिट कास्ट केले जाऊ शकते. ती यामध्ये अक्षयच्या लव्ह इंट्रेस्टच्या रोलमध्ये दिसणार आहे. तिने अशातच अक्षय आणि चित्रपट डायरेक्टर फरहादसोबत 'हाउसफुल 4' मध्ये काम केले आहे. 'बच्चन पांडे' 2014 मध्ये रिलीज झालेला तामिळ चित्रपट 'वीरम' चा रीमेक आहे. हा चित्रपट पुढच्यावर्षी क्रिसमसवर रिलीज होईल. 

 

'पृथ्वीराज चौहान' पुढच्यावर्षी स्वातंत्र्य दिनाला होऊन शकते रिलीज...  
अक्षय कुमारने आतापर्यंत पुढच्यावर्षीसाठी त्याची आवडती तारीख 15 ऑगस्ट बुक केलेली नाही. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे तो 'पृथ्वीराज चौहान' पुढच्यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रिलीज करण्याचा विचार करत आहे. सूत्रांनी सांगितले, अक्षय मागच्या काही वर्षांपासून कमीत कमी एक चित्रपट तरी अक्षय 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला रिलीज करतो. पुढच्यावर्षी मार्चमध्ये त्यांचा चित्रपट 'सूर्यवंशी' रिलीज होत आहे पण अद्याप त्याने स्वातंत्र्य दिनासाठी कोणत्याची चित्रपटाच्या रिलीजची घोषणा केली नाहीये. 

 

लवकरच सुरु होईल शूटिंग... 
चित्रपट 'पृथ्वीराज चौहान' डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी डायरेक्ट करत आहे. अद्यापत याचे शूटिंग सुरु झालेले नाही. पण सर्वांनाच माहित आहे की, अक्षय नेहमी आपले काम वेळेत पूर्ण करतो. मात्र चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनमध्ये वेळ लागू शकतो. हे पाहणे मजेदार असेल की, तो चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज करू शकतो की, नाही. 

बातम्या आणखी आहेत...