आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Krysta Davis Was Told 18 Weeks Into Her Pregnancy Her Baby Had Anencephaly, Missing Parts Of Her Skull And Brain, The Baby Was Expected To Live Just Moments

गर्भातच मुलीला झाला विचित्र आजार, डॉक्टरांनी सांगितले की, जन्म झाल्यानंतर काही वेळातच होईल तिचा मृत्यू; पण यामुळे आईने घेतला बाळाला जन्म देण्याचा निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


क्लेवलँड (टेनेसी) : अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेला आपल्या गर्भात वाढणाऱ्या मुलीचा जन्म झाल्यानंतर मृत्यू होणार हे माहीत होते. पण यानंतरही एका भावनिकतेमुळे मुलीला जन्म देण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी देखील गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता. पण महिला यासाठी तयार झाली नाही. ती मुलीला जन्म देण्यावर ठाम होती. माझ्यासारख्या इतर आईंनी दुःखाचा सामना करू नये यासाठी मी मुलीला जन्म देणार असल्याचे महिलेचे म्हणणे होते. यावेळी महिला मुलीचे अवयवदान करत इतर मुलांचे प्राण वाचविण्याविषयी बोलत होती. 

 

विना डोक्याची गर्भात वाढत होती मुलगी....

- अमेरिकेतील टेनेसी येथील क्लेवलँड शहरात राहणाऱ्या क्रिस्टा डेविस (23) आणि तिचा पार्टनर डेरेक लोवेट (26) यांची ही कथा आहे. 18 आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर डॉक्टरांनी क्रिस्टाला सांगितले की, गर्भात असलेल्या मुलीला एनिन्सेफली नावाचा आजार झालेला आहे. यामुळे तिच्या मेंदू तयार होत नाहीये. 

- डॉक्टरांनी सांगितले की, या आजारामुळे मुलीचा गर्भात मृत्यू होऊ शकतो. पण जर वाचली तर काही तासांसाठीच ती जिवंत राहू शकते. यामुळे डॉक्टरांनी क्रिस्टाला तत्काळ प्रसुती करून मुलीला पाडण्याचा सल्ला दिला होता. यानंतर पुन्हा प्रेग्नंसी टर्म पूर्ण करण्याची वाट पाहण्यास सांगितले होते. 

- सोबत तिचा मिसकेरिज (गर्भपात) होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. सत्या माहीत झाल्यानंतरही क्रिस्टा गर्भपात करण्यास तयार झाली नाही. तर उलट तिने प्रेग्नसीचा कालावधी आनंदात घालवण्याचा निर्णय घेतला.


सर्व माहीत असूनही यामुळे दिला मुलीला जन्म

- जन्माला आल्यानंतर काही वेळातच मुलीचा मृत्यू होणार हे कटू सत्य माहीत असूनदेखील क्रिस्टाने प्रेग्नंनी कालावधी पूर्ण करण्याचा निश्चय केला. तिची मुलगी काही वेळासाठी जरी जिवंत राहत असली तरी तिच्या मृत्यूनंतर ती इतर मुलांचे प्राण वाचवेल असे क्रिस्टाला वाटत होते. 

- मुलीच्या मृत्यूनंतर तिचे अवयव दान करण्यात यावे ही क्रिस्टाची इच्छा होती. यामुळे इतर मुलांचे प्राण वाचवता येतील. यासाठी तिने मुलीला जन्म देण्याचा निर्णय घेतला. तिचे म्हणणे होते की, आम्ही तर आमच्या मुलीला घरी घेऊन जाऊ शकणार नाही. पण मुलीचे अवयवदान केल्याने इतर परिवारांना हे दुःख सोसावे लागणार नाही. तसेच माझी मुलगी इतर मुलांमध्ये जिवंत राहणार असल्याचे क्रिस्टाचे म्हणणे होते. 

बातम्या आणखी आहेत...