Home | Business | Auto | KTM 125 Duke or Yamaha R15 or TVS Apache 200 which bike is best

Royal Enfield पेक्षाही स्वस्त आहेत या टॉप-3 बाइक, किंमत 1.30 लाख; जाणून घ्या फीचर्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 03:50 PM IST

जाणून घ्या KTM 125 Duke, Yamaha R15 आणि TVS Apache 200 मध्ये कोणती बाइक आहे बेस्ट

 • KTM 125 Duke or Yamaha R15 or TVS Apache 200 which bike is best

  बिझनेस डेस्क - भारतीय प्रीमियम बाइक सेगमेंटमध्ये युरोपीयन KTM 125 Duke या नव्या बाइक प्रवेश केला आहे. 1.18 लाख रूपये किमतीसह ही बाइक लाँच करण्यात आली आहे. ही नवी बाइक भारतात Yamaha R15 आणि TVS Apache 200 यांना टक्कर देणार आहे. किमतीविषयी बोलायचे झाले तर Yamaha R15 ची किंमत 1.16 लाख रूपये आहे. तर TVS Apache 200 साठी 1.10 लाख रूपये खर्च करावे लागतात. अशात या तिन्ही बाइकची तुलना त्यांच्या डिझाइन, फीजर्स आणि परफॉर्मेंसच्या आधारावर होईल.

  डिझाइन आणि फीचर्स

  > तिन्ही बाइकमध्ये केटीएम 125 ड्यूकची मिनिमल बाइड आहे. पण याचा रायडिंग पोझिशन आरामदायक आहे. सोबतच वजनाच्या बाबतीत ड्यूक टीव्हीएसपेक्षा 1 किलोने कमी आहे. तर टीव्हीएस A200 तिन्ही बाइकमध्ये सर्वात जास्त जड आहे आणि यमाहा R15s 134 किलोग्रामसह तिघांमध्ये सर्वात हलकी आहे.

  > बॉडी फ्रेमवर्कमध्ये टीव्हीएस अपाची 200 चा दुसरा क्रमांक येतो. पण यमाहा R15sचा बॉडीफ्रेस सगळ्यात जास्त आहे. यमाहाची बाइक चालवताना चांगला अनुभव येतो. त्यामुळे ही बाइक स्पोर्ट सायडर्सच्या पसंतीस पडू शकते. याचा रियर-सेट फुटपेज आणि हँडलबार या बाइकला इतरांपेक्षा वेगळे बनवतात. ड्यूक आणि टीव्हीएस या दोन्ही बाइकमध्ये डिजीटल डॅश बोर्ड मिळेल तर यमाहा मध्ये सेमी डिजीटल डॅश बोर्ड मिळणार आहे.


  पुढे वाचा- ब्रेक आणि सेफ्टी फीचरविषयी.....

 • KTM 125 Duke or Yamaha R15 or TVS Apache 200 which bike is best

  ब्रेक आणि सेफ्टी फीचर 

  > टीव्हीएस आणि केटीएम या दोन्ही बाइकमध्ये एबीएसचा पर्याय मिळतो. पण केटीएममध्ये फक्त सिंगल चॅनल एबीएस आहे. तर यमाहाच्या बाइकमध्ये एबीएस देण्यात आलेले नाही. 

   

  > तिन्ही बाइकमध्ये दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक मिळणार आहे. केटीएममध्ये 300mm/230mm, टीव्हीएसमध्ये 270mm/240mm आणि यमाहामध्ये 267mm/220mm आकाराचे डिस्क ब्रेक असणार आहे. 

   

  > सस्पेंशनविषयी सांगायचे झाले तर, तिन्ही बाइकमध्ये समोर monoshock सस्पेंशन देण्यात आले आहे. टीव्हीएस आणि यमाहामध्ये समोरील सस्पेंशन सारखेच आहे. तर केटीएममध्ये telescopic fork सस्पेंशन सिस्टम असणार आहे. 

   

  पुढे वाचा - इंजिन आणि परफार्मेंस बद्दल  

 • KTM 125 Duke or Yamaha R15 or TVS Apache 200 which bike is best

  इंजिन आणि परफार्मेंस

  > केटीएम ड्यूकमध्ये 124.7 सीसी सिंगल सिलेंडर. लिक्विड कूल्ड इंजिन मिळणार आहे. ते 14.5 हॉर्सपॉवर, 9250 आरपीएम आणि 12 न्यूटन मीटर टार्क जनरेट करते. यामध्ये 6 स्पीड ट्रांसमिशन मिळतील. 


  > टीव्हीएस अपाचीमध्ये 197.7 सीसी सिंगल सिलेंडर ऑईल कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 20.5 हॉर्सपॉवर आणि 18.1 न्यूटन मीटर टार्क डिलीवर करते. यामध्ये 5 स्पीड ट्रांसमिशन मिळतील. 


  > यमाहा 15s मध्ये 149 सीसीचे सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन असणार आहे. हे इंजिन 16.6 हॉर्सपॉवर, 8500 आरपीएम आणि 15 न्यूटन टार्क जनरेट करते. यामध्ये देखील 6 स्पीड ट्रांसमिशन असणार आहे. 

Trending