आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलभूषण जाधव यांना मिळणार दिलासा, इम्रान सरकार लष्कराच्या कायद्यात करणार बदल  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पाकिस्तानातील तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांना दिलासा देणारे वृत्त समोर आले आहे. कुलभूषण जाधव यांना आपल्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध सिव्हील कोर्टात अपील करता यावी, यासाठी इम्रान सकरार आपल्या सैन्या कायद्यात बदल करणार आहे. बुधवारी पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समधून ही माहीती समोर आली आहे. कुलभूषण जाधव(49) यांना 2017 मध्ये पाकिस्तानी सैन्य न्यायालयाने दहशतवादी कारवाया आणि हेरगिरीच्या आरोपाखाली मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली होती.कुलभूषण यांच्यावर असलेल्या खटल्याची सुनावनी पाकिस्तानातील सैन्य कोर्टात झाली होती. सध्याच्या नियमानुसार, सिव्हील कोर्टात या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल केली जाऊ शकत नाही. पाकिस्तानने हा निर्णय जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय(आयसीजे)च्या निर्णयाला पाहून घेतल्याचे समजते. आयसीजेने जाधव यांना भारतीय काउंसलरशी संपर्क करण्याची परवानगी देणे आणि त्यांच्या मृत्यू दंडाच्या शिक्षेवर पुनर्विचार करण्याच्या बाजुने दिला होता.

बातम्या आणखी आहेत...