आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: आता इंडस्ट्रीपासून दूर आहे हा गायक, लोक काय म्हणतील या भीतीपोटी मुलगी दत्तक घेतल्याचे ठेवले होते लपवून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय गायक कुमार सानू यांचा आज (22 सप्टेंबर) वाढदिवस असून त्यांनी वयाची 61 वर्षे पूर्ण केली आहेत.  22 सप्टेंबर 1957 रोजी कोलकाता येथे जन्मलेले केदारनाथ भट्टाचार्य म्हणजेच कुमार सानू यांना 1990 साली आलेल्या 'आशिकी' चित्रपटाने स्टार सिंगर बनवले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आता मात्र अनेक दिवसांपासून ते चित्रपटांपासून लांब आहेत. त्यांनी 2015 साली 'दम लगा के हइशा' या चित्रपटात एक गाणे गायले होते. हा चित्रपट नव्वदीच्या दशकातील एक प्रेमकथा दाखवणारा होता. 

 

या कारणामुळे इंडस्ट्रीपासून दूर आहेत कुमार सानू..
- कुमार सानू यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गाणे गायले नाही, याबाबत त्यांना विचारले असता त्याने मुलाखतीत सांगितले की, मी अश्लीलतेने भरलेले गाणे गाण्यास इच्छुक नाही.
- त्यांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या गाण्यात अश्लीलतेचे प्रमाण खूप आहे आणि गाण्यांनाही काही अर्थ उरला नाही. चार बोतल वोदका, काम मेरा रोज का... यांसारखे गाणे म्हणण्यात मला अजिबात इंट्रेस्ट नाही.
- कुमार सानू यांनी सांगितले की, मी असे गाणे म्हणून म्युझिक इंडस्ट्रीला खराब करु इच्छित नाही. आजच्या काळात प्रोड्युसरला जसे पाहिजे तसे गाणे बनवले जाते. त्यात प्रेक्षकांचा विचार केला जात नाही.

 

कुमार सानू यांची फॅमिली..
कुमार सानू यांनी दोनदा लग्न केले आहे. त्यांनी 1994 साली दुसरे लग्न केले. त्यांच्या पत्नीचे नाव सलोनी सानू आहे. रीता हे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव होते. त्यांनी 1994 साली रिता यांच्यापासून घटस्फोट घेतला होता. दुसऱ्या पत्नीपासून कुमार सानू यांना दोन मुले आहेत.  अॅना हे त्यांच्या मुलीचे तर नाल कुमार जानू हे मुलाचे नाव आहे. त्यांनी शॅनन नावाच्या मुलीला काही वर्षांपूर्वी दत्तक घेतले होते. अशाप्रकारे ते दोन मुली आणि एका मुलाचे वडील आहेत. त्यांची तिन्ही मुले संगीत क्षेत्रात नाव कमवत आहेत. 

 

लोक काय म्हणतील या भीतीपोटी मुलगी दत्तक घेतल्याचे ठेवले होते लपवून 
कुमार सानू यांनी त्यांची मुलगी शॅनन हिला 2001 मध्ये दत्तक घेतले होते. पण लोक काय म्हणतील या भीतीपोटी त्यांनी मुलगी दत्तक घेतल्याचे लपवून ठेवले होते. याविषयी ते म्हणतात, "मला कधीच या गोष्टीचा उलगडा करायचा नव्हता. कारण, समाज याविषयी काय विचार करेल, काय प्रतिक्रिया देईल याचाच विचार करुन मी भीत होतो. या साऱ्याकडे पाहण्याचा नेमका त्यांचा काय दृष्टीकोन असेल, याचाच विचार मी करत होतो. पण, आता मात्र ही गोष्ट सर्वांसमोर उघड झाली असून, मला शॅननचा म्हणजेच माझ्या मुलीचा प्रचंड अभिमान वाटत आहे. ती माझी स्वत:ची मुलगी असो वा नसो यामुळे इथे फारसा फरक पडतच नाही", असे ते एका कार्यक्रमात म्हणाले होते. 


पॉप सिंगर म्हणून प्रसिद्ध आहे शॅनन... 
आपल्या मुलीविषयी कुमार सानू सांगतात, ‘ती खूप महत्त्वाकांक्षी आणि मेहनती असून आतापर्यंत तिने बरंच यश संपादन केलं आहे. हॉलिवूडमधील बरीच मंडळी मला तिच्या नावाने ओळखतात आणि ही माझ्या कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट आहे.’ कुमार सानूची मुलगी पॉप संगीतात बरीच लोकप्रिय असून, ‘अ लाँग टाइम’ हे तिचं गाणं बरंच गाजलं आहे.

बातम्या आणखी आहेत...