आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kumbh News : Kumbh 2019 Sadhus Of Niranjani Akhada Are Professor And Law Expert, Most Educated Gave Lectures In Iit Iim

Professor अन् Law एक्सपर्ट साधू-संत आहेत या आखाड्याची शान, काहींचे आहे संस्कृतवर प्रभुत्व, तर काही करताहेत Ph.D.

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रयागराज (अलाहाबाद) - कुंभ 2019 (Kumbh 2019) चे दुसरा शाही स्नान (Shahi Snan) सोमवारी पार पडले. या दिवशी मौनी अमावस्या आहे. या वेळी ही तिथी 4 फेब्रुवारी रोजी आली आहे. 15 जानेवारी 2019 रोजी पहिल्या शाही स्नानापासून सुरू झालेला कुंभ मेळा (Kumbh Mela) 4 मार्चपर्यंत चालेल. जगातील  या सर्वात मोठ्या धार्मिक आयोजनाला युनेस्कोनेही मान्यता दिली आहे. या मेळ्यात येणारे साधू आणि आखाडे (Akada) खास आकर्षण असतात. यापैकीच एक आहे निरंजनी आखाडा, यात तब्बल 70 टक्के साधू-संतांनी उच्चशिक्षण प्राप्त केले आहे. यात डॉक्टर, लॉ एक्सपर्ट, प्रोफेसर, संस्कृतचे विद्वान आणि आचार्यही सामील आहेत. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी...


निरंजनी आखाड्याचे डॉक्टर-कायदेतज्ज्ञ 
या आखाड्याचे महेशानंद गिरी भूगोलाचे प्राध्यापक आहेत, तर बालकानंद डॉक्टर व पूर्णानंद गिरी कायदेतज्ज्ञ व संस्कृत विद्वान आहेत. संत आनंदगिरी यांनी आयआयटी खरगपूर, आयआयएम शिलाँगमध्ये लेक्चर्स दिलेली आहेत.

 

१०० हून अधिक महामंडलेश्वर उच्चशिक्षित 
आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी सांगतात, निरंजनी आखाडा अलाहाबाद-हरिद्वारमध्ये पाच शाळा-महाविद्यालये चालवतो. हरिद्वारमध्ये एक संस्कृत महाविद्यालय आहे. याचे व्यवस्थापन संत सांभाळतात. वेळोवेळी विद्यार्थ्यांना शिकवतात. 


फेमस आहे निरंजनी आखाडा (Niranjani Akhada)
-सनातन संस्कृती या पुस्तकात महापर्व सिंहस्थासंबंधी सिद्धार्थ शंकर गौतम यांनी लिहिले आहे की, निरंजनी आखाड्याची स्थापना ९०४ मध्ये मांडवीत झाली होती. तर इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी हे १९०४ वर्ष असल्याचे म्हटले आहे. सर्व आखाड्यात निरंजनी आखाडा सर्वात प्रसिद्ध आहे. यात सर्वात जास्त उच्चशिक्षित साधू-संत आहेत. ते शैव परंपरा मानतात. जटा ठेवतात. या आखाड्याचे इष्टदेव कार्तिकेय आहेत. ते देवांचे सेनापती होते. याचा इतिहास डुंगरपूर राज्याचे राजगुरू मोहनानंद याच्या काळाशी जुळतो.

- सर्व आखाड्यांमध्ये निरंजनी आखाडा सर्वात प्रसिद्ध आहे. यात सर्वात जास्त उच्चशिक्षित साधु-संत आहेत, जे शैव परंपरा मानतात. जटा राखतात. या आखाड्याचे इष्टदेव कार्तिकेय आहेत. जे देवांचे सेनापती आहेत.
- याचा इतिहास डूंगरपूर संस्थानाचे राजगुरू मोहनानंद यांच्या काळाशी मिळतो. शालिग्राम श्रीवास्तव यांनी आपले पुस्तक 'प्रयाग प्रदीप'मध्ये सांगितले आहे की, याचे स्थान दारागंज आहे. हरिद्वार, काशी, त्र्यंबक, ओंकार, उज्जैन, उदयपूर, बगलामुखी यासारख्या ठिकाणी याचे आश्रम आहेत.
- महंत अजि गिरी, मौनी सरजूनाथ गिरी, पुरुषोत्तम गिरी, हरिशंकर गिरी, रणछोर भारती, जगजीवन भारती, अर्जुन भारती, जगन्नाथ पुरी, स्वभाव पुरी, कैलाश पुरी, खड्ग नारायण पुरी, स्वभाव पुरी यांनी मिळून या आखाड्याची पायाभरणी केली होती.

 

शंकराचार्यांनी स्थापन केले होते 7 आखाडे
- असे मानतात की, 13 प्रमुख आखाड्यांपैकी 7 ची स्थापना खुद्द शंकराचार्यांनी केली होती. हे आखाडे होते- महानिर्वाणी, निरंजनी, जुना, अटल, आवाहन, अग्नी आणि आनंद. यांचा उद्देश हिंदू मंदिरांना आणि लोकांना आक्रमकांपासून वाचवणे होता.
- या सर्व आखाड्यांमध्ये सर्वात मोठा आखाडा जुना आखाडा आहे. यानंतर निरंजनी आणि महानिर्वाणी आखाडा आहे. याचे अध्यक्ष श्री महंत आणि आखाड्यांचे प्रमुख आचार्य महामंडलेश्वर यांच्या रूपात मानले जातात.


 

बातम्या आणखी आहेत...