Home | Jeevan Mantra | Dharm | Kumbh Mela 2019 Latest News and Update Naga Sadhu Unknown Facts

सोपे नाही नागा साधू होणे, कठीण परीक्षांमधून गेल्यानंतर मिळते दीक्षा

रिलिजन डेस्क | Update - Jan 11, 2019, 03:25 PM IST

Kumbh Mela 2019: स्वतःचे पिंडदान, वस्त्रांचा त्याग आणि धुनीजवळ काढावे लागले नागा साधूंना आपले जीवन

 • Kumbh Mela 2019 Latest News and Update Naga Sadhu Unknown Facts

  मकरसंक्रांतीपासून प्रयागराज (अलाहाबाद) येथे महाकुंभ (Mahakumbh 2019) ची सुरुवात होत आहे. मकरसंक्रांतीला पहिले शाही स्नान होईल. सर्व 13 आखाड्यांचे साधू-संत प्रयागराज येथील संगम तटावर डुबकी लावून महाकुंभ (Kumbh mela 2019)ची सुरुवात करतील. या महाकुंभमध्ये नागा साधू लोकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. साधू-संतांचे जीवन तसेची कठीणच असते परंतु नागा साधूंचे जीवन सर्वात जास्त कठीण असते. नागा साधू बनण्याची प्रक्रिया सोपी नाही. यांना कठोर नियम-कायदे आणि शिस्तीचे पालन करावे लागते.


  जुना आखाड्याचे महंत विजयगिरी महाराजांनी दिलेल्या माहितीनुसार नागा साधूंना लष्करातील सैन्याप्रमाणे तयार केले जाते. सैन्याच्या ट्रेनिंगपेक्षा कठोर ट्रेनिंग नागा साधूंना दिली जाते. यांना धर्म रक्षक आणि योद्धा मानले जाते. एका सामान्य माणसापासून नागा साधू बनण्याचा मार्ग खूप कठीण असतो. नागा साधू बनण्यापूर्वी स्वतःचे पिंडदान करावे लागते. प्रत्येक आखाड्याची दीक्षा देण्याची पद्धत वेगवेगळी आहे. परंतु काही नियम-कायदे असेही आहेत जे प्रत्येक आखाड्याला पाळावे लागतात. जाणून घ्या, त्या नियमांची माहिती...


  चौकशी -
  जेव्हा एखादा व्यक्ती साधू बनण्यासाठी आखाड्यात जातो, तेव्हा त्याला लगेच आखाड्यात प्रवेश मिळत नाही. आखाडा स्वतःच्या पद्धतीने त्या व्यक्तीची पूर्ण चौकशी करतो. व्यक्तीला साधू कशासाठी व्हायचे? त्याच्या कुटुंबाची संपूर्ण पार्श्वभूमी पहिली जाते. जर आखाड्यातील सदस्यांना तो व्यक्ती साधू बनण्यास योग्य आहे असे वाटले तरच त्याला आखाड्यात प्रवेश दिला जातो.


  ब्रह्मचर्याचे पालन -
  आखाड्यात प्रवेश मिळाल्यानंतर त्याची ब्रह्मचार्याची परीक्षा घेतली जाते. यासाठी सहा महिन्यांपासून 12 वर्षांचा काळ लागू शकतो. या प्रक्रियेत केवळ दैहिक ब्रह्मचर्यच नाही तर मानसिक नियंत्रणही पारखले जाते. अचानक कोणालाही दीक्षा दिली जात नाही. संबंधित व्यक्ती पूर्णपणे इच्छा आणि वासनेपासून मुक्त झाला आहे की नाही, याची खात्री केली जाते.


  पाच गुरु -
  त्या व्यक्तीने ब्रह्मचार्याची परीक्षा पूर्ण केल्यानंतरच तो महापुरूष बनतो. त्याचे पाच गुरु ठरवले जातात. हे पाच गुरु पंचदेव किंवा पंच परमेश्वर (शिव, विष्णु, शक्ती, सूर्य, आणि गणपती) हे असतात. त्यानंतर त्याला भस्म, भगवे वस्त्रे आणि रूद्रक्षांची माळ दिली जाते. या वस्तूच नागासाधूंचे अलंकार समजल्या जातात.


  स्वतःचे पिंडदान आणि श्राद्ध
  महापुरूषानंतर साधूला अवधूत बनवले जाते. त्याचे केस कापले जातात. अवधूत बनण्यासाठी त्याला आधी स्वत:चे पिंडदान करावे लागते. आखाड्यातील पुरोहीत हे पिंडदान करतात. या माध्यमातून संबंधित व्यक्ती हा समाज आणि कुटूंबियांसाठी मृत झाल्याचे सिद्ध होते. त्यानंतर वैदिक धर्माची रक्षा करणे हा त्याच्या जीवनाचा एकमेव उद्देश बनतो.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, नागा साधू बनण्यासाठी कोणते नियम अनिवार्य आहेत...

 • Kumbh Mela 2019 Latest News and Update Naga Sadhu Unknown Facts

  असे बनतात नागा साधू - 
  या प्रक्रियेमध्ये साधूंना 24 तास उपाशी आखाड्याच्या झेंड्याखाली उभे राहवे लागते. झेंड्याखाली उभे असताना त्याच्या खांद्यांवर एक काठी आणि हातात एक मातीचे भांडे दिले जाते. आखाड्याचे पहारेदार या वेळी साधूंवर लक्ष ठेऊन असतात. यानंतर आखाड्यातील मुख्य साधू मंत्रोच्चार करत या साधूच्या लिंगाला जोरात झटका देऊन ते निष्क्रिय करतात. यानंतर तो व्यक्ती नागा साधू बनतो.


  मंत्रामध्ये आस्था - 
  दीक्षा घेतल्यानंतर गुरुकडून मिळालेल्या गुरुमंत्रावर संपूर्ण श्रद्धा ठेवावी लागते. भविष्यातील सर्व तपश्चर्या याच गुरुमंत्रावर आधारित असते.


  भस्म आणि रुद्राक्ष -  
  नागा साधूंना विभूती आणि रुद्राक्ष धारण करावा लागतो. शिखा सूत्र (शेंडी)चा त्याग करावा लागतो. नागा साधूंना सर्व केसांचा त्याग करावा लागतो. ते डोक्यावर शेंडीसुद्धा ठेवू शकत नाहीत केस ठेवायचे असल्यास जटा धारण कराव्या लागतात.

 • Kumbh Mela 2019 Latest News and Update Naga Sadhu Unknown Facts

  एकदाच जेवण -
  नागा साधूंना चोवीस तासामध्ये एकदाच जेवण करण्याची परवानगी असते. ते अन्नही भिक्षा मागून आणावे लागते. एक नागा साधूला जास्तीत जास्त सात घरांमध्ये भिक्षा मागण्याचा अधिकार आहे. सात घरांमधून कोणीच भिक्षा दिली नाही तर उपाशी राहावे लागते. जे अन्न मिळेल ते प्रसन्न मनाने ग्रहण करावे लागते.


  जमिनीवरच झोपणे -
  नागा साधू झोपण्यासाठी पलंग, खाट (बाज) किंवा इतर कोणत्याही वस्तूचा वापर करू शकत नाहीत. नागा साधूंना जमिनीवरच झोपावे लागते. हा खूपच कठीण नियम असून प्रत्येक साधूला या नियामचे पालन करावे लागते.


  इतर नियम -
  वस्तीच्या बाहेर राहण्यास परवानगी नाही, कोणालाही नमस्कार न करणे आणि कोणाचीही निंदा न करणे. फालत संन्याशाला नमस्कार करणे इ. आणि आणखी काही नियमांचे पालन दीक्षा घेणाऱ्या साधूला करावे लागते.


  नाग साधूंचे पद आणि अधिकार-
  नागा साधूंची अनेक पद व अधिकार असतात. नागा साधू बनल्यानंतर त्याची बढती होत राहते. नागा साधू, महंत, जातीय मंहत, थानपती महंत, पीर महंत, दिगंबरश्री, महामंडलेश्वर आदी पदे त्याला मिळत असतात.

Trending