आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

49 दिवसांच्या कुंभासाठी वसते तात्पुरती महानगरी, 15 कोटी भाविकांची मांदियाळी, 4300 कोटी खर्च 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रयागराज- जगातील सर्वात मोठा धार्मिक व आध्यात्मिक मेळा प्रयागराज कुंभ मंगळवारी मकरसंक्रांतीपासून सुरू झाला आहे. हा मेळा १५ जानेवारी ते ४ मार्चपर्यंत असा ४९ दिवस चालणार आहे. यंदाच्या मेळ्यात सुमारे १३ ते १५ कोटी भाविक येणे अपेक्षित आहे. त्यापैकी सुमारे १० लाख परदेशी नागरिक यात सहभागी होतील. उत्तर प्रदेश सरकारने कुंभ २०१९ चे वर्णन 'न भूतो न भविष्यति' असे भव्य-दिव्य असल्याचा दावा केला आहे. 

 

प्रयागराज क्षेत्रावर मेळा सुमारे ४५ किलो मीटर क्षेत्रफळ परिसरात पसरला आहे. पूर्वी त्याची व्याप्ती केवळ २० किमी परिसराची होती. मेळ्यासाठी ५० कोटी रुपये खर्चून ४ टेंट सिटी वसवण्यात आली आहे. त्यांना कल्पवृक्ष, कुंभ कॅन्व्हास, वैदिक टेंट सिटी, इंद्रप्रस्थम सिटी अशी नावे देण्यात आली आहेत. 

 

कुंभच्या काळात प्रयागराजमध्ये जगातील सर्वात मोठी भक्तिनगरी वसते. सरकारी आकड्यांनुसार कुंभच्या आयोजनावर ४३०० कोटी रुपये खर्च झाला आहे. यंदा कुंभची संकल्पना 'स्वच्छ कुंभ, सुरक्षित कुंभ' अशी आहे. सरकारने १० कोटी लोकांना मोबाइलवरून कुंभला येण्याचे निमंत्रण पाठवले आहे. 

 

४ तीर्थस्थळी १२ वर्षांनंतर एकदा कुंभमेळा 
भारतात ४ ठिकाणी कुंभमेळा भरतो. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन व नाशिक आहे. त्यापैकी प्रत्येक तीर्थस्थळी १२ वे कुंभ आयोजित केले जाते. प्रयागमध्ये दोन कुंभ पर्वांदरम्यान ६ वर्षांच्या अंतराने अर्धकुंभ होतो. प्रयागराजमध्ये गेल्या वेळी २०१३ मध्ये कुंभ झाला होता. २०१९ मध्ये अर्धकुंभ झाला. यूपी सरकार याला कुंभ संबोधते. प्रयागराजमध्ये पूर्ण कुंभ २०२५ मध्ये होईल. 

 

शाही स्नान : १५,२१ जानेवारी, ४,१०, १९ फेब्रु, ४ मार्च 
केव्हा असतो कुंभ : 
प्रयागराज कुंभमेळा मकरसंक्रांतीच्या दिवशी सुरू होतो. सूर्य व चंद्र वृश्चिक राशीत व बृहस्पती मेष राशीत प्रवेश करतो. 
श्रद्धा : कुंभचा अर्थ कलश. त्याचा संबंध समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या अमृत कलशाशी आहे. देव व दैत्य यांच्यात अमृत कलशावरून आेढाआेढ सुरू झाली होती. तेव्हा त्यामधील काही थेंब तीन नद्यांत पडले होते. जेथे थेंब पडले. तेथे कुंभाचे आयोजन केले जाते. या नद्यांची नावे गंगा-गोदावरी, क्षिप्रा आहेत. 

 

इतिहास : सर्व दान केले 
प्रयागराज कुंभाचा लिखित इतिहास चौथ्या ते सहाव्या शतकातील गुप्तकालीन आहे. 
चिनी प्रवासी हेनसाँगने आपल्या पुस्तकात कुंभचा उल्लेख केला आहे. सन ६१७ ते ६४७ पर्यंत तो भारतात होता. प्रयागमध्ये राजा हर्षवर्धनने आपले सर्वकाही दान देऊन तो राजधानीत परतला होता. 

 

सुविधा

६९० किमी परिसरात पाणी, विजेचाही पुरवठा 
- मेळ्यातील आयोजनात राज्याच्या २० तर केंद्राच्या ६ संस्था सक्रिय आहेत. 
- यंदा मेळ्यात ६९० किमी भागात पिण्याचे पाणी व ८०० किमी क्षेत्रात वीज पुरवठाही. 
- २५ हजार पथदिवे लावण्यात आले आहेत. ७ हजार स्वच्छता कर्मचारी व २० हजार पोलिस तैनात. ४ पोलिस लाइनसह ४० पोलिस ठाणी, ३ महिला ठाणी, ६२ पोलिसांचे तळ बनवले. पोलिसांसाठी देखील पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. 
- पहिल्यांदाच कुंभमध्ये २ एकीकृत नियंत्रण कक्षाची स्थापना केली. हा मेळा येणारी गर्दी व वाहतुकीवर नियंत्रणाचे काम करेल. सुरक्षाही प्रदान करेल. एका केंद्रावर ११६ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. 
- पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झाला आहे. त्याद्वारे गर्दीचे नियंत्रण केले जाईल. भाविकांसाठी व्हर्च्युअल रिअॅलिटी सेवा उपलब्ध करण्यासाठी १० स्टॉल तयार केले आहे. 

 

कुंभची काही वैशिष्ट्ये 
45 किमी क्षेत्रात कुंभमेळा. 
600 पाकगृह. 
48 दूध केंद्र. 
200 एटीएम 
4 हजार हॉट स्पॉट लावलेत. 
1.20 लाख बायोटॉयलेट. 
800 विशेष रेल्वे गाड्या. 300 किमी मार्गाला जत्रेचे रूप. 
40 हजार एलईडी लाइट 
5 लाख वाहनांसाठी पार्किंग 

 

बातम्या आणखी आहेत...