आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 किमी परिसरात कुंभमेळा : साधू-संत पाेहाेचले संगमावर; याेगींनी 450 वर्षांनंतर प्रयागराजमध्ये भाविकांसाठी खुला केला \'अक्षयवट\'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रयागराज- उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू हाेणाऱ्या पहिल्या शाही स्नानास तीन दिवस उरले आहेत. त्यापूर्वीच कुंभनगरी प्रयागराज देश-विदेशातील भाविक व पर्यटकांच्या भव्य-दिव्य स्वागतासाठी सज्ज झाली असून कल्पवासी संगमावर पाेहाेचणे सुरू झाले आहे. त्यासाठी गंगा-यमुनेच्या संगमावरील तिन्ही बाजूंना वास्तव्यासाठी टेंटदेखील टाकण्यात आले आहेत. या वेळी कुंभमेळ्याचा विस्तार ४५ किमी परिसरात करण्यात आला आहे. यापूर्वी ताे २० किमी परिसरात असायचा. गुरुवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी तयारीची पाहणी केली. तसेच संगमतटावरील अकबर किल्ल्यात असलेल्या 'अक्षयवट'ला खुले केले. गत ४५० वर्षांत प्रथमच 'अक्षयवट' व 'सरस्वती कूप' भाविकांकरिता उघडण्यात आले. तत्पूर्वी याेगी यांनी 'अक्षयवट' ची पूजा-अर्चा केली. त्यानंतर खुस्राेबागेचे लाेकार्पणही केले. या वेळी याेगी म्हणाले की, यामुळे ४५० वर्षांपासून दबलेल्या भावनांना एक नवीन ऊर्जा मिळेल. दरम्यान, यंदा ५० वर्षांच्या तुलनेत संगमावर चांगला पाणीसाठा आहे.

 

कुंभमेळा परिसरात १.२२ लाख बायाे-टाॅयलेट 
- याेगींनी सांगितले की, या कुंभमेळ्यास प्रथमच आंतरराष्ट्रीय आयाेजनाचा दर्जा मिळाला आहे. 
- १५ फ्लायओव्हर अंडरब्रिज बनवले असून २६४ रस्त्यांचे रुंदीकरण केले गेले आहे. यासह मेळा परिसरात २२ पान्टून ब्रिजही साकारले आहेत. 
- याशिवाय भाविकांच्या साेईसाठी १.२२ लाख बायाे-टाॅयलेट बनवण्यात आले असून २० हजारपेक्षा जास्त डस्टबिन ठेवण्यात आल्या आहेत. 
- १,३०० हेक्टर क्षेत्रात ९४ पार्किंग विभाग बनवले असून शहरात शटल बससेवा व ई-रिक्षा चालवल्या जाणार आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...