आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तुझ्या या कुरूप वेड्या पिल्लाचा राजहंस झाला आई...' आईच्या सन्मानाने भारावला कुशल बद्रिके

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'चला हवा येऊ द्या' या मराठी शोमधून सर्वांना हसायला भाग पडणाऱ्या सर्व कलाकारांचे खूप चाहते आहेत. त्यांच्यातील हसवण्याचा या अनोख्या शैलीमुळे ते सर्वांच्याच मनात घर करून जातात. याच कार्यक्रमातील एक कलाकार म्हणजे कुशल बद्रिके. कुशल बद्रिकेने आपल्या इंस्टाग्रामवर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. झाले असे की, झी मराठी या वाहिनीवर आज अवॉर्ड शो होणार आहे या शोदरम्यान सर्व विनोदवीरांच्या मातांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला आहे. विनोदवीरांच्या मातांचा सन्मान झाल्यानंतर त्यांनी आपापल्या मुलांचे कौतुकही केले. यात कुशल आणि त्याची आईदेखील होते. आईच्या या सन्मानाने भारावलेल्या कुशलने ही भावुक पोस्ट आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...