आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kushal Punjabi, Kushal Punjabi Suicide Note: TV Actor Kushal Punjabi, Dividing His Property Between Father, Mother And Sister And His Son Kian

कुशल पंजाबीने आई-वडील आणि मुलगा कियान यांना दिली संपत्ती, लिहिले- 'माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः टीव्ही अभिनेता कुशल पंजाबीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाइड नोट सापडली आहे. कुशलने चिठ्ठीत लिहिले आहे की, त्याच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये. याशिवाय त्याने त्याची मालमत्ता पालक, बहीण आणि मुलगा यांच्यात विभागली आहे. जवळचे मित्र आणि अभिनेता चेतन यांच्या म्हणण्यानुसार कुशल लग्न यशस्वी न झाल्यामुळे नाराज होता. त्याची बायको त्याला सोडून निघून गे होती. सध्या अभिनेत्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे.

  • 'माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये'

अभिनेत्याच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या दीड पानांच्या सुसाईड नोटमध्ये असे म्हटले आहे की, त्याच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये. त्याने लिहिले की, त्याच्या मालमत्तेपैकी 50% पालक आणि बहिणीमध्ये समान प्रमाणात वाटणी करावी. याव्यतिरिक्त उर्वरित 50 टक्के मालमत्ता तीन वर्षाच्या मुलाला कियानला द्यावी. डीसीपी परमजीत सिंग यांनी आत्महत्येची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की , कुशलचे पालक सतत त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते, पण त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ते घरी पोचले तेव्हा त्यांना मुलगा मृतावस्थेत आढळला.

  • मित्र चेतन हंसराजने सांगितले आत्महत्येचे कारण

चेतनने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कुशल काही काळ आजारी होता आणि आयुष्यात खूप अस्वस्थ होता. तो नेहमीच प्रत्येक परिस्थितीशी लढायला तयार राहायचा. त्याचे आम्ही कायम फायटर म्हणूनच स्मरण करु. विशेष म्हणजे 2015 मध्ये कुशलने गोव्यात त्याची युरोपियन मैत्रीण ऑड्रे डोल्हनबरोबर लग्न केले होते. त्या दोघांना कियान हा तीन वर्षांचा मुलगा आहे.

बातम्या आणखी आहेत...