आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुशल पंजाबीच्या शोकसभेत चेहरा लपवून पोहोचली पत्नी ऑड्रे, दिसला नाही 3 वर्षांचा मुलगा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शोकसभेत कुशल पंजाबीची पत्नी ऑड्रे डोलन. दुस-या बाजूला कुशल, ऑड्रे आणि मुलगा कियान पंजाबीचा फाईल फोटो - Divya Marathi
शोकसभेत कुशल पंजाबीची पत्नी ऑड्रे डोलन. दुस-या बाजूला कुशल, ऑड्रे आणि मुलगा कियान पंजाबीचा फाईल फोटो

टीव्ही डेस्कः कुशल पंजाबींच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी रविवारी मुंबईत एक शोकसभा आयोजित करण्यात आली होती. कुशलची पत्नी ऑड्रे डोलनसुद्धा या शोकसभेला आली होती. मीडियापासून ती आपला चेहरा लपवताना दिसली. शोकसभेत अनेक टेलिव्हिजन सेलेब्स पोहोचले आणि कुशलच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली. या सेलिब्रिटींमध्ये कविता कौशिक, करणवीर बोहरा, आमिर अली, चेतन हंसराज, अपूर्व अग्निहोत्री, शिल्पा सकलानी यांचा समावेश आहे.

कुशलने केली होती आत्महत्या : टीव्ही अभिनेता कुशल पंजाबी (वय 37) याचा मृतदेह गुरुवारी रात्री उशिरा त्याच्या मुंबईच्या फ्लॅटमध्ये पंख्यावर लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलिसांनी सुरुवातीच्या प्राथमिक चौकशीनंतर कुशलने आत्महत्या केल्याचे सांगितले होते. तपास अधिका्यांना मृतदेहाजवळ एक सुसाइड नोटही सापडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुशल हा सिंधी कुटुंबातील असून तो वांद्रा पश्चिमेकडील अल्शीद बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये वास्तव्याला होता. नोव्हेंबर 2015 मध्ये त्याने युरोपियन गर्लफ्रेंड ऑड्रे डोलेनबरोबर लग्न केले होता. या दोघांना 3 वर्षांचा एक मुलगा असून कियान हे त्याचे नाव आहे.

अयशस्वी लग्नामुळे अस्वस्थ होता कुशल : कुशलचा मित्र चेतन हंसराजने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, कुशल विवाहित जीवनामुळे अस्वस्थ होता. त्याची पत्नी ऑड्रे काही काळापासून त्याच्यापासून वेगळी राहात होती. मुलाला घेऊन ती शांघायला निघून गेली होती. या व्यतिरिक्त कुशल डिप्रेशनमध्ये होता. त्यातच त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. कुशल आर्थिक संकटाशी झगडत असल्याचेही काही रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...