आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्र चेतनचा खुलासा, अयशस्वी लग्नामुळे नाखूश होता कुशाल पंजाबी, पत्नी सोडून निघून गेली होती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी ऑड्रेसोबत कुशाल - Divya Marathi
पत्नी ऑड्रेसोबत कुशाल
  • चेतनने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, कुशालने आत्महत्या केली आहे.

टीव्ही डेस्कः वयाच्या 37 व्या वर्षी टीव्ही अभिनेता कुशाल पंजाबीच्या निधनाने संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्रीला हादरा बसला आहे. कुशालचा जवळचा मित्र चेतन हंसराज हे स्वीकारण्यास असमर्थ आहे की, त्याचा मित्र यापुढे या जगात नाही. चेतनने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, कुशालने आत्महत्या केली आहे.


कुशाल वाईट काळातून जात होता 
चेतनने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “होय, कुशलने आत्महत्या केली आहे. तो आणि त्यांची पत्नी सेपरेशनच्या प्रक्रियेत होते. कुशालही काही काळापासून आजारी होता. कुशाल अजूनही या जगात नाही यावर माझा विश्वास नाही. काही दिवसांपूर्वी मी त्याच्याशी बोललो. त्याने मला सांगितले की, तो व्यथित झाला आहे. मी त्याला सांगितले की, आयुष्यात चढउतार येत असतात, तुला संघर्ष करावा लागेल. पण मी स्वप्नातही विचार केला नव्हता की, तो असे पाऊल उचलेल, ही फार दुःखद गोष्ट आहे.''


चेतन 20 वर्षांपासून कुशालला ओळखत होता
चेतन पुढे म्हणाला, “मी कुशालला गेल्या 20 वर्षांपासून ओळखत होतो. तो खूप आनंदी मुलगा होता आणि तो नेहमी हसत होता. कोणत्याही परिस्थितीशी लढण्याचा त्याच्यात आत्मविश्वास होता आणि त्याने आजूबाजूच्या लोकांनाही तंदुरुस्त राहण्याचे प्रोत्साहन दिले. तो माझ्यासाठी भावासारखा होता. आम्ही दोघे एकत्र वाढलो. कोणीही त्यांची पोकळी भरू शकणार नाही. ''


गोव्यात लग्न
कुशालने नोव्हेंबर 2015 मध्ये गोव्यात आपली युरोपियन मैत्रीण ऑड्रे डोलनसोबत लग्न केले होते. या दोघांनाही एक मुलगा आहे.  कुशाल आपल्या मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे. पण काही काळापासून त्याची पत्नी मुलासह शांघाय येथे राहत होती आणि कुशाल मुंबईत एकटाच राहत होता.


कुशालने टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम केले
 कुशालने डान्सर आणि मॉडेल म्हणून इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. त्याने 1995 मध्ये 'ए माउथ फुल ऑफ स्काय' द्वारे टीव्ही कारकीर्दीची सुरूवात केली. यानंतर तो 'लव्ह मॅरेज', 'कसम से', 'देख मगर प्यार से', 'डॉन' अशा अनेक मालिकांमध्ये दिसला. कुशाल हा बॉलिवूडमधील बर्‍याच चित्रपटांचा भाग होता. त्याने 'लक्ष्या', 'सलाम ए इश्क', 'हमको इश्क ने मरा' यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.