Home | International | Pakistan | kuwait ban on pakistani people

कुवेतमध्ये येण्यास पाकिस्तानी नागरिकांना बंदी

Agency | Update - May 22, 2011, 04:33 PM IST

कुवेतने पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशात येण्यास पूर्णपणे बंदी केली आहे.

  • kuwait ban on pakistani people

    मनामा - कुवेतने पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशात येण्यास पूर्णपणे बंदी केली आहे. पाकिस्तानसह सिरीया, इराक, इराण आणि अफगणिस्तान येथील नागरिकांना यापुढे कुवेतचा व्हिसा मिळणार नाही.

    स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या देशांतील नागरिकांना पर्यटन, व्यापार असा कोणत्याही प्रकारचा व्हिसा देण्यात येणार नाही. कुवेतमध्ये राहत असलेल्या या देशातील नागरिकांच्या नातेवाईकांना त्यांना बोलविण्याची परवानगी नसणार आहे. या देशांमध्ये हिंसक कारवाया जास्त होत असल्याने कुवेतने हा निर्णय़ घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ही बंदी कायमची नसून, या देशांतील परिस्थिती सुधारल्यानंतर ती उठविण्यात येणार आहे. सध्या यात कोणतीही सूट देण्यात येणार नाही.

Trending