आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही कंपनी देत आहे कारवर जबरदस्त इयर-एंड ऑफर, 2 लाखांपर्यंतची देण्यात येत आहे सवलत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क - 2018 वर्ष संपण्यात फक्त एक महिना बाकी आहे. अशातच बऱ्याच ऑटो कंपन्या त्यांच्या कारवर इयर-एंड डिस्काउंट देत आहेत. होंडा आणि हुंदई नंतर आता रेनॉल्ट आपल्या हॅचबॅक. MPV आणि SUV यांसारख्या कारवर डिस्काउंट देत आहे. शहर आणि शोरूम प्रमाणे हा डिस्काउंट असू शकतो. 

 

Renault Kwid : 40,000 रूपयांपर्यंतची बचत

> रेनॉल्ट आपल्या लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री होणारी हॅचबॅक क्विडवर 40 हजार रूपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. यावर 15 हजार रूपये कॅश डिस्काउंट. 15 हजार रूपये एक्सचेंज बोनससोबत एका वर्षाचा विमी दिल्या जात आहे. कॉर्पोरेट डिस्काउंटनुसार 2000  रूपयांचा लाभ मिळणार आहे. 

 

> क्विडला दोन वेगवेगळ्या इंजिन व्हेरिअंटमध्ये लॉन्च केले आहे. यामध्ये 800cc आणि 1000cc पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. 'क्विड' रेनॉल्ट कंपनीची सर्वांत स्वस्त कार आहे. क्विडची शोरूम किंमत 2,66,700 रूपये आहे. अशातच डिस्काउंटनंतर याची किंमत 2,26,700 रूपये होते.


Renault Duster : 1.05 लाख रूपयांपर्यंतची बचत
> रेनॉल्ट आपल्या या लोकप्रिय SUV कारवर 1.05 लाख रूपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. यामध्ये डीलरकडून 60 हजार रूपयांपर्यंतचा कॅश बेनिफिट, एका वर्षासाठी मोफत विम्यासोबत 5 हजार रूपयांपर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काउंट देण्यात येत आहे. यामध्ये 1.5 लीटरचे इंजिन आणि 6 स्पीट गिअर बॉक्स देण्यात आला आहे. तर या गाडीचे 25 किलोमीटरचे मायलेज असल्याचा दावा कंपनी करत आहे. 

 

Renault Captur : 2 लाख रूपयांपर्यंतची बचत
> कंपनी SUV सेगमेंटच्या या कारवर 2 लाख रूपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. याच्या टॉप व्हेरिअंटवर 1 वर्षाचा विमा फक्त 1 रूपयात देण्यात येत आहे. या कारच्या पेट्रोल व्हेरिअंटची किंमत 9.99 लाख आणि डिझेल व्हेरिअंटची 11.25 लाख रूपये आहे. इअर एंड ऑफरच्या काळात ही कार 2 लाख रूपयांपर्यंत स्वस्त खरेदी करू शकता. 

 

Renault Lodgy : 1.55 लाख रूपयांपर्यंतची बचत
> रेनॉल्ट आपल्या या 7 आसनी कारवर 1.55 लाख रूपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. विशेष म्हणजे फक्त डीलर्स या कारवर इतकी जास्त सवलत देत आहेत. म्हणजे तुम्हाला यासाठी इतर कोणत्याही प्रकारच्या बोनस डिस्काउंटचा आवश्यकता नाही. Lodgy व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत 9.54 ते 11.12 लाख रूपये आहे. 

 

नोट : रेनॉल्ट कंपनीची ऑफर शहर किंवा डीलरवर बदलू शकतो. एखाद्यावेळेस या ऑफरमुळे आपल्याला जास्त फायदा मिळू शकतो किंवा या ऑफरचा तितका फायदा नाही मिळणार.

 

बातम्या आणखी आहेत...