आयपीएल : सॅम कुरनच्या धारदार गाेलंदाजीवर पंजाबच्या किंग्जने दिल्ली जिंकली

Apr 02,2019 08:45:00 AM IST

माेहाली - युवा गाेलंदाज सॅम कुरनच्या (४/११) धारदार गाेलंदाजीच्या बळावर यजमान किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने साेमवारी १२ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये शानदार विजयाची नाेंद केली. पंजाब संघाने लीगमधील अापल्या चाैथ्या सामन्यात पाहुण्या दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. पंजाबने १९.२ षटकांत १४ धावांनी सामना जिंकला. यासह अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाब संघाने लीगमध्ये तिसऱ्या विजयाची नाेंद केली. यासह पंजाबने गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सला लीगमध्ये दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.


प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ९ बाद १६६ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सला १९.२ षटकांत अवघ्या १५२ धावांवर अापला गाशा गुंडाळावा लागला. दिल्लीकडून ऋषभ पंत (३९), काेलिन (३८), अाणि शिखर धवन (३०) यांनी एकाकी झंुज दिली. मात्र, त्यांना अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही. त्यामुळे टीमला दुसऱ्या पराभवाला सामाेरे जावे लागले.


कुरनचे चार बळी : पंजाबच्या विजयामध्ये युवा गाेलंदाज सॅम कुरन चमकला. त्याने धारदार गाेलंदाजी करताना चार बळी घेतले. त्याने २.२ षटकांत अवघ्या ११ धावा देताना हे यश संपादन केले. त्याने काेलिनसह हर्षल पटेल, रबाडा अाणि लामिच्छेनेला बाद केले. तसेच शमी अाणि अश्विनने प्रत्येकी दाेन बळी घेतले.

X