गेल ३०० षटकार ठाेकणारा पहिलाच; किंग्ज इलेव्हन पंजाबचा दुसरा विजय; मुंबई टीमचा लीगमध्ये दुसरा पराभव

वृत्तसंस्था

Mar 31,2019 09:09:00 AM IST

माेहाली - अश्विनच्या नेतृत्वाखाली यजमान किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने शनिवारी १२ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये दुसऱ्या विजयाची नाेंद केली. पंजाबने अापल्या घरच्या मैदानावर तीन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सला धूळ चारली. ख्रिस गेल (४०) अाणि लाेकेश राहुलच्या (७१) झंझावाती खेळीच्या बळावर १८.४ षटकांमध्ये अाठ गड्यांनी विजय संपादन केला. यादरम्यान गेलने चार उत्तंुग षटकारांसह विजयी खेळी केली. यातून त्याला विक्रमी ३०० षटकारांचा पल्ला गाठता अाला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १७६ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात पंजाब संघाने दाेन गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून अाणली. संघाच्या विजयामध्ये मयंक अग्रवाल (४३) अाणि डेव्हिड मिलरने (नाबाद १५) माेलाचे याेगदान दिले. क्विंटन डिकाॅकने (६०) केलेली खेळी व्यर्थ ठरली.


दिल्लीचा सुपर विजय
काेलकाता-दिल्ली यांच्यातील लढत टाय झाली. त्यामुळे हा सामना सुपर अाेव्हरमध्ये झाला. यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने ६ चेंडूंमध्ये १ बाद १० धावा काढल्या. प्रत्युत्तरात काेलकाता संघाला ७ धावा काढता अाल्या. दिल्लीने १८५ धावा काढून हा सामना सुरुवातील टाय केला.

X
COMMENT