आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयपूर - अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाबच्या किंग्जने साेमवारी १२ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये राजस्थानविरुद्ध राॅयल विजयाची नाेंद केली. किंग्ज इलेव्हन पंजाबने १४ धावांनी सामना जिंकला. यासह पंजाबने लीगमध्ये विजयाचे खाते उघडले. यजमान राजस्थान संघाला घरच्या मैदानावर सलामीच्या लढतीत लाजिरवाण्या पराभवाला सामाेरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ४ बाद १८४ धावा काढल्या. प्रत्युत्तरात राजस्थानला ९ गडी गमावून १७० धावांपर्यंत मजल मारता आली.
धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थान संघाला कर्णधार अजिंक्य रहाणे आणि जाेस बटलरने चांगली सुरुवात करून दिली. या दाेघांनी तुफानी फटकेबाजी करताना संघाला ७८ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. दरम्यान, अश्विनने सलामीवीर रहाणेला (२७) बाद केले. त्यानंतर जाेस बटलरने आपले अर्धशतक साजरे केले. त्यालाही अश्विनने बाद करून संघाला माेलाचे दाेन बळी मिळवून दिले. आता पंजाब संघाचा स्पर्धेतील दुसर सामना उद्या काेलकाता नाइट रायडर्सशी हाेईल. तसेच शुक्रवारी राजस्थान राॅयल्स संघासमाेर सनरायझर्स हैदराबाद संघाचे आव्हान असेल. या सामन्यात राजस्थानला विजयाची संधी आहे.
गेलच्या ७९ धावा
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या स्फाेटक फलंदाज ख्रिस गेलने झंझावाती अर्धशतक झळकावले. त्याने ४७ चेंडूंमध्ये ७९ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने आठ चाैकारांसह चार उत्तुंग षटकार ठाेकले. यासह त्याने यंदाच्या सत्रातील आयपीएलमध्ये पहिल्याच सामन्यात अर्धशतकाने खाते उघडले. त्याने राजस्थानच्या सुमार गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेत ही तुफानी खेळी केली.
जाेस बटलरचे अर्धशतक :
राजस्थान राॅयल्सच्या सलामीवीर जाेस बटलरने शानदार खेळी करताना अर्धशतक ठाेकले. त्याने ४३ चेंडूंचा सामना करताना १० चाैकार आणि दाेन षटकारांच्या आधारे ६९ धावा काढल्या. यासह त्याने टीमच्या धावसंख्येला गती दिली. माेठ्या खेळीच्या प्रयत्नात असलेल्या बटलरला पंजाबच्या अश्विनने बाद केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.