आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपच्या अडवाणींची 296 दिवस लोकसभेत उपस्थिती, परंतु तीन मिनिटांत फक्त 365 शब्दच बाेलले!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपचे लोहपुरुष व मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी मागील पाच वर्षांपासून शांत अाहेत. ९१ वर्षीय अडवाणी मागील पाच वर्षांपासून नेहमीप्रमाणे लाेकसभेच्या पुढील बाकावरच बसतात व माेजकेच दिवस संसदेत येतात. १६ व्या लोकसभेत अडवाणी यांची उपस्थिती ९२ टक्के राहिली. परंतु जवळपास त्यांचे भाषण झालेच नाही. पाच वर्षांत ते २९६ दिवस संसदेत उपस्थित हाेते. परंतु फक्त ३६५ शब्दच बाेलले. १६ व्या लोकसभेत (२०१४-१९) मध्ये १५ व्या लाेकसभेच्या (२००९-१३)तुलनेत ९९ टक्के कमी बाेलले. १५ व्या लोकसभेत अडवाणी यांनी  ४२ वेळा चर्चा व अन्य कामकाजात सहभाग घेतला. जवळपास ३५ हजार ९२६ शब्द बाेलले. मागील पाच वर्षांत अडवाणी फक्त पाच वेळा लाेकसभेच्या चर्चा व कामकाजात सहभागी झाले. २००९ ते २०१४ दरम्यान ४२ वेळा त्यांनी कामकाजात सहभाग घेतला.   


सात वर्षांपूर्वी अासामी घुसखोरांच्या मुद्द्यावर ४९५७ शब्द बाेलले हाेते. शुक्रवारी एकही शब्द बाेलले नाही : ८ अाॅगस्ट २०१२ रोजी लोकसभेत आसाममधील घुसखोरी व राज्यात झालेल्या जातीय हिंसाचारासंदर्भात स्थगन प्रस्तावावर चर्चा सुरू हाेती. त्या वेळी भाजपकडून या चर्चेचे नेतृत्व अडवाणी यांनी केले. त्या दिवशी संसदेत खूप गोंधळ झाला. त्यानंतरही लालकृष्ण अडवाणी बाेलत राहिले. त्यांना जे सांगायचे हाेते ते सांगितले. त्या एका दिवसाच्या भाषणात ४,९५७ शब्द ते बाेलले. या भाषणात ५० वेळा व्यत्यय अाला. अाता जानेवारी २०१९ मध्ये लोकसभेत नागरिकत्व संशोधन विधेयक मांडण्यात अाले. यावर चर्चा झाली. 

बातम्या आणखी आहेत...