आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशी गायींसाठी औरंगाबादेत लॅब; मुख्यमंत्र्यांची घोषणा, शासकीय खर्चातून राज्यातील गायींचा विमा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - राज्यात शासकीय खर्चातून गायींचा विमा काढला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पशुसंवर्धन विभागाला दिले. शिवाय उत्तम प्रतीच्या देशी गायींच्या प्रजातींची संख्या वाढवण्यासाठी औरंगाबादेते सिमेन सॉर्टेड लॅब उभारण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. 
जालना येथे आयोजित महा पशुधन प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. पशुधन जगवण्यासाठी स्वस्तात औषधी मिळावी म्हणून जेनेरिक मेडिकल, पशुधनासाठी रुग्णवाहिका उपलब्ध केली जाणार आहे. पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी यासंदर्भात मागणी केली होती. 


दूध वाढीसाठी उपयोगी 
दुग्धोत्पादनवाढीसाठी राज्य सरकारने सिमेन सॉर्टेड लॅब हे तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. या माध्यमातून गायींपासून कालवड जन्माला येईल. त्यामुळे राज्यात गायींची संख्या वाढेल व पर्यायाने दूध उत्पादनात वाढ होऊ शकते. 
 

बातम्या आणखी आहेत...