आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच कंपनीत काम करणाऱ्या विवाहितेच्या एकतर्फी प्रेमात होता, नांदेडच्या कामगाराची वाळूजमध्ये आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकतर्फी प्रेमातून तरुण कामगाराने घेतला गळफास
  • स्वतः दोन मुलांचा बाप होता कामगार सत्यपाल
  • सुट्यांमध्ये पत्नी नांदेडला असताना उचलले टोकाचे पाउल

संतोष उगले

वाळूज - वाळूज एमआयडीसी येथील एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सत्यपाल सावते (31) असे या कामगाराचे नाव होते. पांडुरंग हाउसिंग सोसायटीत भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या घरातच सोमवारी रात्री 9.30 च्या सुमारास त्याने गळफास घेतल्याची माहिती समोर आली. तो एका खासगी कंपनीत काम करत होता. तसेच प्राथमिक तपासात त्याच्या आत्महत्येचे कारण देखील पोलिसांना सापडले आहे.

विविहेतेच्या एकतर्फी प्रेमात होता सत्यपाल
सत्यपाल सावते आपल्याच कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेच्या प्रेमात पडला होता. ती महिला विवाहित होती, तसेच सत्यपालचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. आपली प्रेम कहाणी अपुरीच राहणार या नैराश्यात तो होता. त्याच नैराश्यात सत्यपालने टोकाचे पाउल उचलले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्यांना सत्यपालच्या खिशातून एक सुसाइड नोट देखील सापडले आहे. त्यामध्ये त्याने आपल्या आत्महत्येचे कारण लिहिले आहे.

दोन मुलांचा बाप होता सत्यपाल, पत्नी माहेरी असताना टोकाचे पाउल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यपाल विवाहित होता. तसेच त्याला आपल्या पत्नीकडून दोन मुले देखील आहेत. सत्यपालची पत्नी आपल्या मुलांसोबत दिवाळी सुट्यांच्या निमित्ताने मूळ गावी नांदेडला गेली होती. याच दरम्यान एकटे असताना सत्यपालने गळफास घेतला. प्राथमिक तपासानुसार, त्याने रविवारी रात्रीच आत्महत्या केली होती. तर सोमवारी रात्री उशीरा हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.