Home | National | Other State | labourer attacked 35 times with sharp weapon over illicit affair with neighbour in punjab

Live Murder: पत्नीच्या प्रियकरावर धारदार कोयत्याने केले 35 वार; काही मिनिटांतच परतला, मग मृतदेहावरही काढला राग

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 10:56 AM IST

लाल बाबू आणि आपल्या पत्नीचे अफेअर सुरू असल्याच्या संशयात परगटने त्याचा खून केला.

  • चंदीगड - पाहताक्षणी अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ पंजाबच्या लुधियाणातील एका गावात सीसीटीव्हीत टिपला आहे. यामध्ये हातात धारदार कोयता घेऊन जाताना आरोपी दिसत आहे. दुसऱ्याच क्षणी त्याने एका युवकावर एकानंतर एक अवघ्या दीड मिनिटांत तब्बल 35 वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात पीडित युवकाचा जागीच मृत्यू झाला. सीसीटीव्हीत कैद झालेल्या व्हिडिओमध्ये हल्लेखोर निघून गेला. यानंतर जवळपास 4 मिनिटांत तो पुन्हा परतला आणि मृतदेहावर राग काढत पुन्हा सपा-सप वार केले. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलिसांनी आरोपी परगट सिंह उर्फ काला या मजुराला अटक केली आहे.


    पत्नीचा प्रियकर असल्याचा संशय...
    पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला कोयता आणि आरोपीची टीशर्ट जप्त केली. पीडित युवकाचे नाव लाल बाबू भगत असे होते. मूळचा बिहारच्या मुझफ्फरनगर येथील रहिवासी होता. तसेच गेल्या काही वर्षांपासून हरदीप सिंहच्या शेतात मजुरी करत होता. दिवाळी निमित्त तो सुट्टीवर होता आणि शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता आपल्या घराबाहेर फिरत होता. हरदीप यांनी आपल्या घराच्या अगदी जवळ किंचाळणे ऐकले आणि ते घराबाहेर पडले. तेव्हा शेजारीच राहणारा एक मजूर परगट लाल बाबूवर कोयत्याने हल्ला करत होता. परगट आणि लाल बाबू हे एकमेकांचे शेजारी होते. लाल बाबू आणि आपल्या पत्नीचे अफेअर सुरू असल्याच्या संशयात परगटने त्याचा खून केला.


    मृतदेहावरही करत होता वार...
    सीसीटीव्ही व्हिडिओनुसार, गावातील एका गल्लीत लालू बाबू उभा होता. संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास परगट तेथे आला आणि लाल बाबूशी भांडण्यास सुरुवात केली. लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा परगटने आपल्याकडे असलेला मोठा कोयता बाहेर काढला. 4 वाजून 9 मिनिटे आणि 53 सेकंदाला त्याने लाल बाबूच्या हातावर पहिला प्रहार केला. यानंतर दुसरा प्रहार केला. ठीक 4 वाजून 11 मिनिटे आणि 17 सेकंदाला त्याने एकानंतर एक अवघ्या दीड मिनिटांत 35 वार करून लाल बाबूला ठार मारले आणि निघून गेला. यानंतर अवघ्या 4 मिनिटांत परतला आणि मृतदेहावर सुद्धा प्रहार सुरू केले.

Trending