Home | International | Pakistan | laden death operation

ओसामा बिन लादेनला मारण्यात तालिबानच्या मोरक्याचाच हात

agency | Update - May 30, 2011, 06:14 PM IST

दहशतवादी ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमधील अबोटाबादमध्ये राहत असल्याची गुप्त माहिती तालिबानच्याच एका मोरक्याने अमेरिकेच्या सैनिकाला दिल्याचा दाट संशय आहे. लादेनचा अतिशय विश्वासू सहकारी समजला जाणारा व तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल बरादर यानेच ही माहिती पुरवली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.

  • laden death operation

    मुल्ला बरादर आणि अमेरिकन प्रशासन यांच्यात याबाबत एक समझौता झाला होता, अशी बातमी इंग्लंडमधील मिररच्या वेबसाइटवर झळकली आहे. त्यानुसार लादेनला ठार मारल्यानंतर किंवा जिवंत पकडल्यानंतर तालिबानचा प्रभाव असलेल्या अफगाणिस्तानातून अमेरिकन फौजा मागे हटतील, असे ठरल्याचे सांगण्यात येत आहे. २ मे रोजी अमेरिकन नेव्ही कमांडोंनी पाकिस्तानात घूसून लादेनला ठार केले. त्याची खबर पाकिस्तानसह कोणालाही दिली नाही.

    लादेनचा निरोप घेऊन येणा-या अबू अहमद अल कुवैतीचा फोन टॅप केल्यानंतर अमेरिकेला लादेनचा ठावठिकाणा सापडला, असे बोलले जात होते. मात्र बरादरकडूनच लादेनची इत्यंभूत माहिती अमेरिकेला मिळाली, असे या वृत्तात म्हटले आहे. बरादर हा तालिबानी नेता मुल्ला उमर याचा साथीदार आहे. गेल्या वर्षी कराचीला जात असताना त्याला अटक करण्यात आली होती त्यानंतर गेल्या ऑक्टोबरमध्ये सुटका होण्यापूर्वी त्याची कसून चौकशी करण्यात आली होती. बरादर हा मुल्ला उमर आणि लादेन यांच्या निकटवर्तियांपैकी एक असून, अफगाण सरकारशी वाटाघाटी करण्याची जबाबदारीही तो सांभाळतो.

Trending