Home | International | Pakistan | ladens-wife-want-to-be-dead

लादेनबरोबरच मरण्याची होती तिची इच्छा

वृत्तसंस्था | Update - May 19, 2011, 12:29 PM IST

अमेरिकी जवानांच्या कारवाईत लादेन याची पाचवी पत्नी अमाल अहमद अब्दुल फतह हिच्या पायावर गोळी लागली

 • ladens-wife-want-to-be-dead

  वॉशिंग्टन - अमेरिकी नौदलाच्या जवानांनी पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये केलेल्या कारवाईत अल-कायदाचा म्होरक्य़ा ओसामा बिन लादेन तर मारला गेला. पण आता या कारवाईनंतर उघड होत असलेल्या नाना प्रकारच्या माहितीमुळे लादेन पुढील काही दिवस चर्चेत राहणार हे निश्चित.
  अमेरिकी जवानांच्या कारवाईत लादेन याची पाचवी पत्नी अमाल अहमद अब्दुल फतह हिच्या पायावर गोळी लागली. मात्र, या कारवाईत आपण मृत्युमुखी पडलो असतो, तर अधिक बरे झाले असते, अशी इच्छा तिने व्यक्त केलीये.

  लादेन ५४ वर्षांचा असताना मौलवी शेख रशद यांनी त्याचे त्यावेळी किशोरवयीन असलेल्या अमाल हिच्याशी लग्न लावले होते. आपली पाचवी पत्नी ही उच्च नितीमूल्याची पाठराखण करणारी असावी, अशी लादेनची इच्छा होती. त्यानुसारच मौलवीने त्याचे अमालबरोबर लग्न लावले. लग्नानंतर अमालने आपल्या नवऱयाबद्दल कधीच कोणती तक्रार केली नाही आणि लादेनही तिच्याबरोबरच्या वैवाहिक आयुष्यात कधीच नाराज झाला नव्हता, अशी माहिती एबीसी न्यूजने दिली आहे.

  बेयरफूट इन बगदाद या पुस्तकाचे लेखक आणि मुस्लिम महिलांच्या प्रश्नांचे अभ्यासक मनाल उमर यांनीही अमाल हिच्याबद्दल कौतुकोदगौर काढले आहेत. आपल्या नवऱयासाठी सगळं काही सोडण्यास तयार असलेल्या महिलांपैकी अमाल एक आहे. नवऱयाच्या इच्छेची पूर्तता करणेच, बायकांची सर्वांत मोठी जबाबदारी असते, असे उमर यांनी म्हटले आहे.

  अबोटाबादमध्ये अमेरिकी जवानांनी केलेल्या कारवाईच्यावेळी लादेन याच्या आणखी दोन बायकाही तिथे होत्या. त्यावेळी केवळ अमाल हिनेच लादेनला वाचविण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. जवानांनी केलेल्या गोळीबारात तिच्या पायाला गोळी लागली. सर्वसामान्य मुस्लिम महिलेप्रमाणेच तिची देखील आपल्या नवऱयाबरोबर मृत्युमुखी पडण्याची इच्छा होती, असे उमर यांनी सांगितले.

Trending