आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Ladies Special Fame Jai Javeri Will Be Seen As A Big Devotee Of Sai Baba In 'Mere Sai Shraddha Aur Saburi' Show

 'मेरे साईं- श्रद्धा और सबुरी' शोमध्ये साईबाबांच्या मोठ्या भक्ताच्या भूमिकेत दिसणार 'लेडीज स्पेशल' फेम जय जव्हेरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'मेरे साई-श्रद्धा और सबुरी' मालिकेने नुकतीच एक झेप घेत नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे. आता पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. साईंचे चमत्कार जगभरात प्रसिद्ध आहेतच आणि त्यांची शिकवण आजच्या जगातही प्रासंगिक आहे. मालिकेच्या आगामी कथानकात साईंचे सर्वात मोठे अनुयायी अशी ओळख असणारे दासगणू महाराज दिसणार आहेत.

टीव्ही जगतातील 20 हून अधिक मालिकांमध्ये काम करण्याचा अनुभव असलेला अभिनेता जय जव्हेरी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. साई बाबांना भेटल्यानंतर ज्यांच्या आयुष्याने एक नवीन वळण घेतले अशा दासगणू महाराजांच्या भूमिकेत तो दिसणार आहे. त्यांना गायनाची आवड असते.

'मेरे साई' मध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असणारा जय म्हणाला, "दासगणू महाराजांची भूमिका साकारण्यासाठी मी पूर्णतः सज्ज आहे. आपल्या अभिनयकौशल्याने कायम प्रेक्षकांना प्रभावित करणारा अनुभवी अभिनेता तुषार दळवीबरोबर काम करण्याची मोठी संधी लाभली आहे आणि मला त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळेल अशी खात्री आहे. 'मेरे साई' ही अतिशय सुंदर मालिका आहे जिला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे आणि त्यामध्ये मुख्य भूमिका साकारायला मिळणे ही एक मोठी संधी आहे. ही एका गायकाची व्यक्तिरेखा असल्यामुळे ती माझ्यासाठी अतिशय खास आहे. कारण वास्तविक जीवनात मलाही संगीताविषयी प्रेम आहे. माझ्यावर साईबाबांच्या आशीर्वादाचा वर्षाव होत राहील आणि प्रेक्षकांना माझी भूमिका आवडेल, अशी आशा करतो."

बातम्या आणखी आहेत...