आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या लोकांनी जुन्या बस गाड्यांचा वापर करून तयार केली ही आश्चर्यजनक गोष्ट, पंतप्रधान मोदी देखील करतील यांची प्रशंसा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पुणे : येथील दोन उद्योजकांनी पुणे महानगरपालिकेच्या जुन्या बस गाड्यांचा वापर करून लेडीज टॉयलेटची निर्मीती केली आहे. उल्का सादळकर आणि राजीव खर यांची सरप्लास्ट नावाची कंपनी आहे. ही कंपनी 2016 पासून एसी टॉयलेट तयार करत आहेत. या टॉयलेट्सना 'ती' हे नाव देण्यात आले आहे. हे टॉयलेट्स स्वच्छ भारत मोहिमेत मोलाचे योगदान देत आहे. 


वापर करण्यासाठी द्यावे लागणार फक्त 5 रूपये
या बसेसमध्ये वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही प्रकराचे टॉयलेट तयार करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर या बसमध्ये कमी किमतीत सॅनेटरी नॅपकीन देखील देण्यात येत आहेत. या शौचालयाचा वापर करण्यासाठी महिलांना 5 रूपये द्यावे लागणार आहे. 

 

अशी सुचली कल्पना

उल्का सादळकर यांचे म्हणणे आहे की, जुन्या बस गाड्यांचा बेघरांसाठी घर निर्माण करण्यसाठी वापण्यात येणार असल्याचे आम्ही कुठेतरी ऐकले होते. यावरून या गाड्यांचा उपयोग शौचालय तयार करण्यसाठी होऊ शकतो अशी कल्पना आम्हाला सुचली आणि ती सर्वांना आवडली. कारण आपल्या देशामध्ये शौचालयाची मोठी समस्या आहे. ही कंपनी कार्यक्रमांसाठी मोबाइल टॉयलेट देखील उपलब्ध करते. 

 

सौरऊर्जेवर चालतात या टॉयलेट्स बस 
या टॉयलेट बस गाड्या सौरऊर्जेवर चालतात. प्रत्येक बससाठी एक महिला कर्मचारीची नेमणुक करण्यात आली आहे. स्वच्छतेप्रती जागृतता निर्माण करण्यासाठी या बसेसमध्ये टीव्ही देखील लावण्यात आले आहेत.