आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगल्या घरातील Lady डॉक्टरची हाईप्रोफाइल लोकांसोबत ऊठबस, 4 बेडच्या नर्सिंग होममध्ये सुरू होते हे लाजिरवाणे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - नर्सिंग होममध्ये 14 वर्षीय मुलीला भुलवून तिचे बाळ विकल्याप्रकरणी गायनेकोलॉजिस्ट शानू मसीहला अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे लहान मुलांची खरेदी-विक्री करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. महिला डॉक्टर आणि तिच्या नर्सिंग होममध्ये काम करणाऱ्या नर्सेस दीड ते 5 लाखांमध्ये समोरची पार्टी पाहून मुलांचा सौदा करायचे. नर्सिंग होममध्ये गरीब आणि अल्पवयीन गर्भारणी पाहून डॉक्टर आणि तिचा स्टाफ त्यांना भुलवायचा. अवैध संबंध आणि बलात्कारासारख्या केसेसमध्येही ते आई आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना पैशांची लालूच दाखवून मूल विकण्यासाठी प्रेरित करत होते. मग अनेक श्रीमंत घरांमध्ये एखाद्या निपुत्रिक दांपत्याकडून मोठी रक्कम उकळून हा सौदा व्हायचा.


हॉस्पिटलमध्ये 7 दिवसांपूर्वीच आली होती अल्पवयीन
- मंगळवारी रात्री एका नवजात बाळाला विकताना एका नर्सला अटक करण्यात आली होती. त्यांना या टोळक्याची सूत्रधार लेडी डॉक्टरसहित आणखी 3 महिलांची पोलिसांनी रात्री उशिरा धरपकड केली.

- प्राथमिक चौकशीतच आरोपींनी 4 नवजात विकल्याची कबुली दिली आहे. ज्या बाळाला विकताना पोलिसांनी नर्सला रंगेहाथ पकडले, त्या बाळाची आई ही 14 वर्षांची मुलगी आहे. तिच्यावर बलात्कार कारणाऱ्याविरुद्धही पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे.

- एसएसपी अमरेश मिश्रा म्हणाले की, न्यू राजेंद्र नगरच्या डॉ. शानू मसीह या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. तिचे टिकरापारा हटरी बाजारात 4 बेडचे नर्सिंग होम आहे. 
- तिच्या हॉस्पिटलमध्ये 7 दिवसांपूर्वी 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आली होती. ती राजनांदगांवची रहिवासी आहे. तिला 8 महिन्यांचा गर्भ होता. तिच्याच बाळाला विकताना हे रॅकेट पकडण्यात आले.


आधी घातली भीती, मग दाखवली पैशांची लालूच
- अल्पवयीन मुलीला डॉक्टरांनी भीती घातली की, तिच्यावर पोलिस केस होईल. ती अल्पवयीन असूनही गर्भवती कशी होऊ शकते? डॉक्टर तिला आपल्या घरी घेऊन गेली. तेथे तिची डिलिव्हरी केली. तिने एका मुलाला जन्म दिला.

- नर्स म्हणाली की, एका दांपत्याला मुलाची गरज आहे. तू अल्पवयीन आहेस, मुलाचा कसा सांभाळ करशील? तुला मुलाच्या बदल्यात 80 हजार रुपये मिळतील. यावर अल्पवयीन मुलगी तयार झाली. ही माहिती पोलिसांना कळली. एका महिला पोलिसाने नर्सला बाळासाठी संपर्क केला आणि बाळ विकत घ्यायचा बहाणा केला. नर्सने 1 लाख 20 हजारांत सौदा ठरवला. नर्सला बाळासह टिकरापारा पोलिसांनी रंगेहाथ पकडले.


हायप्रोफाइल लोकांना विकायची मुले
पोलिसांनी सांगितले की, आभा मुदलियार आणि लिली शांती पन्ना चांगल्या कुटुंबातील आहेत. त्यांची हायप्रोफाइल लोकांसोबत ऊठबस असते. याच्याच आडून त्या मुले विकण्याचा गोरखधंदा करत होत्या. दोघीही निपुत्रिक श्रीमंत दांपत्यांचा शोध घेत राहायच्या. त्यांच्याशी सौदा करून मुले विकायच्या. शहरातील चार हायप्रोफाइल लोकांना त्यांनी मुले विकल्याचे कबूल केले आहे. पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत. पोलिसांच्या मते, जी कुणी गर्भवती अल्पवयीन असायची किंवा अवैध संबंधांमध्ये गर्भवती व्हायची, त्यांची डिलिव्हरी ही डॉक्टर आपल्या घरातच करायची.


डॉक्टरांचे लायसन्स रद्द करण्यासाठी पाठवणार पत्र
पोलिस आता या डॉक्टरचे लायसन्स रद्द करण्यासाठी शासनाला पत्र पाठवणार आहेत. पोलिस आता चौकशी करत आहेत की, या टोळक्याने आतापर्यंत किती मुलांचा सौदा केला आहे. त्यांच्याकडे किती जणींची डिलिव्हरी झाली. पोलिस सर्व यादी तपासत आहेत. तसेच यात आणखी कुणाचा हात आहे याचाही पोलिस शोध घेत आहेत.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज व Video   

 

बातम्या आणखी आहेत...