आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच घरात राहत असूनही वेगवेगळ्या खोलीत झोपत होते पती-पत्नी, अखेर पत्नीने उचलले हे पाऊल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत (गुजरात) : शुक्रवारी संध्याकाळी एका महिला डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार मनाली चिंतन पटेलने (29) शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती केपी संघवी रूग्णालयात कार्यरत होती. 2013 मध्ये बीएचएमएसची पदवी घेतल्यानंतर तिने डॉ.चिंतन पटेल सोबत लग्न केले होते. डॉ.चिंतन पटेल पालनपूर पाटिया येथील माँ अॅण्ड बेबी रूग्णालयात कार्यरत आहेत. सासरच्या मंडळी करत असलेल्या दुर्व्यवहारामुळे ती दुःखी असल्याचे सांगितले जाते.  
 
कुटुंबीयांनी सासऱच्यांकडून कफन पण घेतले नाही

मुलीच्या कुटुंबीयांना माहिती मिळताच तिचे पार्थिव आणण्यासाठी सासरी पोहोचले. मुलीचे पार्थिव झाकण्यासाठी त्यांनी सासरच्यांकडे कोणताच कपडा किंवा इतर कोणतेही मदत घेतली नाही. ते आपल्या परीने मुलीचे पार्थिव घरी आणून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. 

 

पती-पत्नी एकाच घरात असून वेगवेगळ्या खोलीत झोपत होते. 

कुटुंबीयांच्या मते, मनाली दीर्घकाळापासून नैराश्यात होती. तिचे सासरचे गेल्या 6 वर्षांपासून तिचा मानसिक छळ करत होते. छळ करणाऱ्यांमध्ये पती, सासु-सासरे शिवाय नणंद-नंदोई यांचा समावेश आहे. पती-पत्नी एकाच राहत असूनही वेगवेगळ्या खोलीत झोपत होते. मनालीवर घटस्फोटासाठी दबाव टाकण्यात येत होता. यासर्व छळाला कंटाळून मनालीने आपली जीवनयात्रा संपवली. पोलिसांनी घटेनेची नोंद करत तपास सुरु आहे. 


सुसाइड नोटमध्ये लिहिले - माझ्या मृत्यूनंतर पतीने मला स्पर्श करू नये

मनालीची मावस बहीण उर्मी सांगितले की, मनालीने सुसाइड नोट लिहिली होती आणि आपल्या भावाला व्हॉट्सअॅपवर मेसेज देखील पाठवला होता. भावाचा नंबर बंद असल्यामुळे तो मेसेज सेंड झाला नाही. पोलिसांनी मनालीचा मोबाइल ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे. मनालीने सुसाइड नोटमध्ये पतीला उद्देशून लिहिले की, ''माझ्या मृत्यूनंतर माझ्या शरीराला स्पर्श करू नये तसेच कोणताही विधी करू नये.'' उर्मीने सांगितले की, पती-पत्नीमध्ये समाधान होण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. पण सासरच्यांनी तिचा छळ करणे थांबवले नाही. पती-पत्नीमध्ये कोणत्या गोष्टींवरून वाद झाला याचा खुलासा अद्यापही झाला नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...