आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भपातासाठी BF सह क्लिनिकच्या चकरा लावत होती 16 वर्षांची GF, डॉक्टरचाच झाला खून; आता समोर आले हे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाझियाबाद - दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादच्या इंदिरापुरम परिसरात एका महिला डॉक्टरचा खून झाला आहे. क्लिनिकमध्ये चाकूने भोसकून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणात 16 वर्षीय अविवाहित मुलीसह तिचा प्रियकर प्राइम सस्पेक्ट आहेत. हे दोघेही फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहे. गायनिक असलेल्या डॉ. सरला मकनपूर परिसरात क्लिनिक चालवत होत्या.

 

गर्भपातासाठी मारत होते क्लिनिकच्या चकरा...
> हत्या होण्याच्या 3 दिवसांपासून 16 वर्षांची गर्भवती मुलगी आणि तिचा प्रियकर याच क्लिनिकच्या चकरा मारत होते. त्यांना क्लिनिकमध्ये गर्भपात करायचा होता. परंतु, डॉ. सरला यांनी तिचा गर्भपात करण्यास स्पष्ट नकार दिला होता. तरीही वारंवार क्लिनिकवर जाऊन ते दोघे डॉक्टरला याचना करत होते. याला वैतागून महिला डॉक्टरने ही गोष्ट आपल्या घरी सुद्धा सांगितली होती. 
> आसामच्या रायकावाली नागलोईच्या राहणाऱ्या 42 वर्षीय डॉ. सरला गुरुवारी रात्री उशीरापर्यंत घरी पोहोचल्याच नाहीत. त्यावर चिंतीत पती मंजूनाथने तिला वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर 1 वाजता मंजूनाथ यांनी क्लिनिक गाठले. तेव्हा डॉ. सरला या रक्तात माखलेला मृतदेह सापडला. डॉ. सरला यांना तीन मुली आहेत.
> इंदिरापुरम पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ऋषि पाल सिंह यांनी सांगितले, की डॉ. सरला यांच्या पोट आणि गळ्यावर चाकूने वार करण्यात आले आहेत. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. तसेच संशयित आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, या हत्येसाठी ज्यांच्यावर आरोप केला जात आहे, त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर सुद्धा पोलिसांकडे नाहीत.

बातम्या आणखी आहेत...