आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lady Doctor Sexually Abused 53 Male Patients Not Rape, List Of Indian Laws On Sexual Abuses

देशातील पहिलेच प्रकरण: या Lady Doctor ने केला 53 पुरुषांवर अत्याचार; तरी होणार नाही बलात्काराचा गुन्हा, जाणून घ्या असे आहेत कायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा - डॉक्टरला भगवानाचा दर्जा दिला जातो. ईश्वरानंतर तुमचा कुणी जीव वाचवत असेल तर तो डॉक्टरच. परंतु, समाजात असेही काही लोक आहेत, ज्यांच्या कृत्यांमध्ये डॉक्टरांचा व्यवसाय कुप्रसिद्ध होत आहे. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशात समोर आले आहे. येथील एका महिला डॉक्टरने केलेल्या कृत्यावर विश्वास बसणार नाही. डॉक्टर म्हणून तिने स्वतःचे हॉस्पिटल उघडले. अनेकांवर यशस्वी उपचारही केले. परंतु, पैसे कमविण्याच्या शॉर्टकटच्या नादात तिने व्यवसायाची आणि माणुसकीची हद्द पार केली. भारतात अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण मानले जात आहे. तरीही तिच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होणार नाही.


असे पकडले...
तिचा बळी ठरलेल्या पुरुषांपैकी एकाने आपल्याला एक महिला डॉक्टर ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार नुकतीच पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी संशयाच्या आधारावर तिला ताब्यात घेतले. चौकशी सुरू असताना आणखी काही पुरुष तिच्याविरोधात समोर आले. त्यानंतर तिने आपला गुन्ह्याची कबुली दिली. तिने अशाच प्रकारे एक-दोन नव्हे, तर तब्बल 53 पुरुषांना लुटल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी तिला अधिकृतरित्या अटक केली असून तिची कसून चौकशी केली जात आहे.

 

पुरुषांना बेशुद्ध करून सेक्स, नंतर ब्लॅकमेल करायची...
उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरातून असलेल्या डॉ. शालिनीने स्वतःचे हॉस्पिटल उघडले होते. उपचारातून मिळणाऱ्या फी आणि कमाईतून ती समाधानी नव्हती. झटक्यात कोट्यधीश होण्याची हाव तिला लागली होती. त्यासाठीच तिने उपचार करण्यासह वेगळाच व्यवसाय सुरू केला. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या पुरुषांना ती इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध बनवत होती. विवाहित पुरुष प्रामुख्याने तिचे लक्ष्य होते. एक-दोन नव्हे, तर अशाच प्रकारे तिने अनेक पुरुष रुग्णांना बेशुद्ध करून त्यांच्यासोबत संबंध बनवले. प्रत्येकवळी तिने त्या क्षणांचे अश्लील व्हिडिओ देखील रेकॉर्ड केले. याच व्हिडिओंच्या माध्यमातून तिने पुरुषांना व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरू केली. अशाच पद्धतीने अवघ्या काही वर्षांतच तिने रुग्णांकडून कोट्यावधी रुपये उकळले आहेत.


काय शिक्षा होऊ शकते...
पुरुषाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्यास त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला जातो. परंतु, महिलेने पुरुषांवर लैंगिक अत्याचार केल्यास त्याला बलात्कार संबोधले जात नाही. अशात या महिला डॉक्टरवर सुद्धा बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. परंतु, लैंगिक शोषण करणे, अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करणे आणि धमकावणे इत्यादी कलमा तिच्याविरुद्ध लावल्या जाऊ शकतात.


लैंगिक अत्याचार संदर्भात काही महत्वाचे कायदे, कलमा आणि शिक्षा..

विनयभंग

कलम 354 - विनयभंग - शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न (1 ते 5 वर्षांची शिक्षा).
कलम 354 (बी) - विनयभंग करण्यासाठी हल्ला करणे (3 ते 4 वर्षे शिक्षा).
कलम 354 (सी) - महिलांना कपडे बदलताना अथवा संभोग करताना पाहणं (3 ते 4 वर्षे शिक्षा).
कलम 354 डी - पाठलाग करणं (हे कृत्य एकदा केल्यास, पहिल्यांदा 3 वर्षे, तर दुसऱ्यांदा केल्यास 5 वर्षे शिक्षा होऊ शकते.)
कलम 354 अ - शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे (यात बळजबरीसाठी तीन वर्षे शिक्षा होऊ शकते.)


बलात्कार
कलम 376 - बलात्कार - सात वर्षे ते जन्मठेप इतकी शिक्षा होऊ शकते. 
कलम 376 (डी) - सामूहिक बलात्कार (जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.)
कलम 376, 302 - बलात्कार करून हत्या - (यासाठीही जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.)
कलम 377 - अनैसर्गिक अत्याचार (कमाल जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.)

 

पोक्सो कायदा
बाललैंगिक अत्याचारविरोधी प्रतिबंध कायदा असं या पोक्सो कायद्याला म्हणतात. अल्पवयीन मुले अथवा मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात या कायद्याच्या तरतुदीअंतर्गत कारवाई होते. हा कायदा अतीव कडक असून, दोषी व्यक्तीस कठोर शिक्षेची तरतूद आहे.

 

फसवणूक, धमकी
कलम 307, 302 -  अ‍ॅसिड हल्ला करणं, तसा प्रयत्न करणाऱ्यास मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
कलम 420 - फसवणूक, खोट्या भूलथापा देणं यासाठी १ ते ५ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.
कलम 509 - धमकावणे, धमक्या देऊन दडपण आणणे यासाठी तीन वर्षे शिक्षा होऊ शकते. 
कलम 384, 85 - खंडणीसाठी धमकावणे, पैसे मागणे यासाठी तीन वर्षे शिक्षा होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...