• Home
  • lady doctor's Modeling photo viral; The government canceled her medical license

म्यानमार / महिला डॉक्टरला मॉडलिंग फोटोशुट करणे पडले महागात, मॉडेलिंगचे फोटो व्हायरल; सरकारने रद्द केला तिचा वैद्यकीय परवाना

तिचे कपडे सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या योग्य नसल्याचा सरकारचा आक्षेप, खासगी आयुष्यात हस्तक्षेप केल्याचा सरकारवर आरोप

वृत्तसंस्था

Jun 18,2019 11:20:00 AM IST

यांगून - म्यानमारमधील एक महिला डॉक्टर व मॉडेल म्वॅ सैन यांनी आपला वैद्यकीय परवाना रद्द केल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. सैन यांनी सरकारवर खासगी आयुष्यात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. वैद्यकीय परिषदेच्या निर्णयास न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही सांगितले. म्यानमारच्या वैद्यकीय परिषदेने त्यांची वैद्यकीय नांेदणी रद्द केली आहे. या महिला डॉक्टरने आपले आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तिचे कपडे सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या योग्य नव्हते, असा त्यांचा आक्षेप आहे. परिषदेने त्यांना ३ जून राेजी एक नोटीस पाठवली आहे. नांग म्वॅ सैन (२९) यांनी फेसबुकवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत. त्यांनी अमेरिकी मॉडेल केंडालची मिमिक्री केली आहे. या छायाचित्रात त्या स्विमिंग सूटमध्ये दिसतात.
अशाच प्रकारची त्यांची आणखी काही छायाचित्रे असून हे वर्तन म्यानमारच्या संस्कृतीविरोधात असल्याचे म्हटले. सॅन यांनी २०१७ मध्ये माॅडेलिंगची सुरुवात केली. त्याआधी त्या डॉक्टर म्हणून ५ वर्षे कार्यरत होत्या.

X
COMMENT