आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lady Drug Inspector Shot Dead At Her Office In Mohali, Shooter Also Commit Suicide

महिला ड्रग इंस्पेक्टरने रद्द केले लायसंस, त्यामुळे ऑफिसमध्ये पिस्तुल घेऊन घुसला व्यक्ती, काही कळायच्या आधीच झाडली गोळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मोहाली(पंजाब)- येथे एका लेडी ड्रग इंस्पेक्टरच्या खूनाचे प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ड्रग अँड फूड कंट्रोलच्या लॅबोरेटरीमध्ये घुसून एका व्यक्तीने महिला ड्रग इंस्पेक्टरला गोळी मारून तिची हत्या केली आणि नंतर त्याचाही मृत्यू झाला. गोळी झाडल्यानंतर युवकाने पळ काढला, पण बाहेर त्याला लोकांनी पकडले, त्यानंतर त्याने पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांच्या तपासात कळाले की, महिला अधिकाऱ्याने त्या व्यक्तीचे लायसंस रद्द केले होते.


गोळीच्या आवाजने उडाला गोधंळ
- मोहालीच्या खरड परिसरात ड्रग अँड फूड कंट्रोलची लॅबोरेटरी आहे. येथे नेहा शौरी ड्रग इंस्पेक्टर पदावार कार्यरत होत्या. दुपारी बलविंदर नावाचा व्यक्ती ऑफिसमध्ये घुसला. नेहा यांना काही कळायच्या आत त्याने त्यांच्यावर गोली झाडली. ऑफिसमध्ये गोळीचा आवाज ऐकून एकच गोंधळ उडाला. आरोपी पळ काढत असताना त्याने त्याला पकडले, या दरम्यान त्याने स्वत:च्या छातीवर गोळी झाडून आत्महत्या केली. दोघांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...