आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गराेदर मामीचा खून; आरोपी पोलिस भाचीला जन्मठेप, खुनाचे कारण अस्पष्टच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गराेदर मामीचा खून करणाऱ्या पाेलिस भाचीला जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी.अग्रवाल यांच्या न्यायालयाने शुक्रवारी सुनावली. उषा समीर भाेसले (२८, रा. उरळीकांचन,पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.  रूपाली उत्तम खेडेकर ऊर्फ रुपाली बाळासाहेब बाेरकर (२७) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिला आराेपीचे नाव आहे. 

 

याबाबत विष्णू बाजीराव भाेसले (४७) यांनी उरळीकांचन पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. भाेसले यांचे चुलतभाऊ समीर भाेसले हे उरळीकांचन मधील सर्वज्ञ हाइट या इमारतीत पत्नी उषा भाेसले व लहान मुलीसह दाेन वर्षांपासून राहत हाेते. समीर भाेसले हे सिव्हिल इंजिनिअर असून काँट्रॅक्टची कामे करतात. त्यांची पत्नी उषा सहा महिन्यांची गराेदर हाेती. भाची रूपाली खेडेकर हीसुद्धा याच इमारतीत तिचा पती बाळासाहेब बाेरकरसाेबत राहत हाेती. २०१४ मध्ये दुपारी विष्णू भाेसले यांना समीर भाेसले याचा फाेन आला की, पत्नी उषा फाेन घेत नसून घरी जाऊन तिला बघून या. त्यानुसार भाेसले यांनाही उषा घरात दिसली नाही. मात्र, परत येताना फ्लॅट नंबर सहामधून आेरडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे त्यांनी फ्लॅटचा दरवाजा वाजवला. मात्र, आतून दरवाजा उघडला नाही. त्यांनी दरवाजाच्या छिद्रातून आतमध्ये पाहिले असता रूपाली बाेरकरने उषाला आेढत नेल्याचे पाहिले. त्या वेळी सुरक्षा रक्षक लंकेश गायकवाड याने दरवाजा ताेडला. या  वेळी बाेरकर ही हाॅलमध्येच उभी होती, तर उषा भाेसले बाथरूमध्ये मृतावस्थेत होती. 


खुनाचे कारण अस्पष्टच
सरकारी वकील रमेश घाेरपडे म्हणाले, आराेपी पाेलिस कर्मचारी हाेती. त्यामुळे तिला कायद्याचे ज्ञान हाेते. त्यामुळे खुनाचे कारण जरी स्पष्ट झाले नाही तरी गुन्हेगारास शिक्षा हाेऊ शकते हे या प्रकरणातून सिद्ध झाले आहे. मृत उषा भाेसले यांचा मृतदेह आराेपीच्या घरात सापडला. हा खून कशासाठी झाला याचे कारण समजू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अशा काही प्रकरणात शिक्षा दिल्याचे ते  म्हणाले. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.

बातम्या आणखी आहेत...