महिला Police अधिका-याने घेतले 5 लाख, पतिला बोलावले, निघणारच होते की घडले असे काही...
राजस्थानच्या अॅन्टी करप्शन ब्युरो (ACB) अधिकाऱ्यांनी एका महिला पोलिस निरीक्षकाला खंडणी घेताना रंगेहात पकडले आहे.
-
जयपूर - राजस्थानच्या अॅन्टी करप्शन ब्युरो (ACB) अधिकाऱ्यांनी एका महिला पोलिस निरीक्षकाला खंडणी घेताना रंगेहात पकडले आहे. येथील शिप्रापथ पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेली महिला पोलिस उपनिरीक्षक बबीता एका ऑनलाइन जाहिरात कंपनीच्या मालकाला धमकावून 50 लाख रुपयांची खंडणी मागत होती. यानंतर 45 लाख देण्यावर सेटलमेंट झाली. ठरल्याप्रमाणे बबीताने पोलिस स्टेशनसमोरच असलेल्या कॅन्टीनवर उद्योजकाला 5 लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. तिने रक्कम घेऊन पती अमरदीपला फोन लावला. हे दोघे कॅन्टीनमधून निघणार तेवढ्यात दारावर भ्रष्टाचारविरोधी पथकाचे अधिकारी थांबले होते.
वकील होता पती, त्यानेच रचला गंडवण्याचा कट
- बबीताचा पती अमरदीप एक वकील आहे. त्याने ऑनलाइन मार्केटिंग आणि जाहिरात डिझायनर कंपनीचे बिटकॉइन संबंधित व्यवहारांचे पुरावे गोळा करून ठेवले होते. त्याने आपली सब-इंस्पेक्टर पत्नी बबीताच्या हाती सर्व पुरावे सोपवले आणि आयटी अॅक्ट अंतर्गत खटला दाखल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. त्याने 10 दिवसांपूर्वीच कंपनीच्या संचालकांची भेट घेतली होती.
- अमरदीप आणि बबीताने खटल्याची धमकी देत कंपनीकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. संचालकांनी आपल्याकडे तेवढी रक्कम नसल्याचे सांगितले. त्यावर 45 लाख रुपये फायनल देण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. याच दरम्यान पीडित संचालकांनी एसीबीकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली. 5 लाखांसोबत रंगेहात पकडल्यानंतर एसीबीने आरोपी पोलिस आणि वकिलांच्या घरी धाड टाकली. त्यावेळी या जोडप्याकडे कोट्यधींची संपत्ती असल्याचा खुलासा झाला.
कंपनीच्या एजंटनेच केली होती आरोपींची मदत
एसीबीने केलेल्या चौकशीमध्ये या कंपनीत करणाऱ्या सोनू नावाच्या युवकानेच आरोपींना संपूर्ण व्यवहारांची माहिती पेन ड्राइव्हमध्ये दिली होती अशा खुलासा झाला. त्यानेच दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी वकील आणि महिला पोलिसाने उद्योजकाकडून पैसे उकळण्याचा कट रचला होता. एसीबीने आता त्या कंपनीच्या व्यवहारांची सुद्धा चौकशी सुरू केली आहे. तर दुसरीकडे, माहिती मिळाल्यानंतरही खटला दाखल न केल्याप्रकरणी बबीताला निलंबित करण्यात आले आहे. तसेच तिची संपत्ती पाहता आणखी सविस्तर चौकशी केली जात आहे. -
-