ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवाशांकडून घाईगर्दीत अनेकदा अशा चुका होतात ज्यामुळे त्यांना कधी-कधी तुरुंगातही जावे लागते किंवा दंड भरावा लागतो. सध्या सोशल मीडियामध्ये एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही तरुण ट्रेनमधील महिला कोचमध्ये प्रवास करताना दिसत आहेत. त्यानंर मेट्रो ट्रेन स्टेशनवर थांबते तेव्हा एक महिला पोलिस तरुणांना बाहेर निघताच बेदम चोप देत आहे. काही तरुणी महिला कोचमध्येच तरुणांना लाथा-बुक्क्यांनी चोप देत असताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहुन युजर्सने अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.