आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून ASI ने एक वर्ष केले महिला इंस्पेक्टरचे लैंगिक शोषण, कागदी कारवाई शिकवण्याच्या बहाण्याने वाढवली जवळीक, 3 वेळा केले अबॉर्शन...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हारदा(मध्य प्रदेश)- जिल्ह्यातील पोलस दलातील एका महिला सब इंस्पेक्टरने विभागाच्या ए.एस.आ. वर लग्नाचे आमिष दाखवून 1 वर्ष लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे. तर 3 वेळा अबॉर्शन करण्यास भाग पाडल्याचा आरोप लावत गुरूवारी तक्रार दाखल केली. पोलिसांना आरोपी ए.एस.आय. उमेश रघुवंशी आणि त्याच्या पत्नीविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना आरोपीला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या घरी गेले पण तोपर्यंत तो फरार झाला होता. पीडित महिला एस.आय. चा आरोप आहे की, आरोपी उमेश रघुवंशीसोबत तिची ओळख हारदा पोलिस ठाण्यात झाली होती. विभागात होणारी कागदी कारवाई शिकवण्याच्या बहाण्याने त्याच्यासोबत जवळीक वाढली आणि त्यानंतर त्याने 1 वर्ष माझे लैंगिक शोषण केले.


3 वेळा करायला लावला अबॉर्शन..
पीडितेच्या तक्रारीनुसार- आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा शारिरीक संबंध बनवले आणि त्यामुळे ती प्रेग्नंट झाली. त्यानंतर आरोपीने तिला अबॉर्शन करायला भाग पाडले, असे त्याने तीन वेळेस केले. या दरम्याने जेव्हा आरोपीच्या पत्नीला याबद्दल कळाले तेव्हा ती घटस्फोट देण्यास तयार झाली, पण आरोपी लग्न करण्यास तयारी दाखवत नव्हता.


पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्याचे वचन दिले
पीडितेने सांगितले- एक दिवस उमेश पोलिस लाइनच्या तिच्या घरी आला. त्यावेळी त्याने पत्नीला घटस्फोट देऊन तिच्यासोबत लग्न करण्याचे अमिष दाखवले. यावरू नाराज होऊन एसआय  आपल्या जातीचे आणि समाजाचे कारण सांगून त्याला हकलून लावले. काही दिवसानंतर पीडित महिला आजारी पडली होती, तेव्हा उमेश तिची विचारपुस करण्यासाठी घरी आला. प्रकृती गंभीर असल्यामुळे उमेश तिला रूगाणालयात घेऊन गेला, आणि तेथून परत आल्यावर तिला गोळी देऊन झोपवले. सकाळी उठल्यावर महिलेला कळाले की, आरोपीने तिच्यासोबत चुकीचे काम केले आहे. पीडितेने तक्रार दाखल करण्याची धमकी दिली, तेव्हा आरोपीने लवकर पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्याचे वचन दिले.


लग्नाचे खोटे प्रमाणपत्र बनवले
पीडितेने सांगितले- एके दिवशी मी उमेशच्या घरी केले, तेव्हा उमेश आणि त्याच्या पत्नीने मला आत घेऊन दार बंद करून घेतले आणि टीव्हीचा आवाज वाढवून मला बेदमा मारहाण केली. नंतर उमेशने आर्य समाजाचे खोटे प्रमाणपत्र देखील बनवले पण  रित्सर लग्न केले नाही. लग्नाबद्दल विचारल्यावर तो टाळु लागला, त्यानंतर मी माझ्या कुटुंबींयांना 1 वर्षापासून घडत असलेला सगळा प्रकार सांगितला आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.


आरोपी पती-पत्नी फरार, शोध सुरू
एक महिला एसआयने एएसआय उमेश रघुवंशी लैंगिक शोषणाचे, आणि अबॉर्शन करण्यास भाग पाडल्याचे आरोप लावत तक्रार दाखल केली. रेप आणि अॅट्रोसिटी अॅक्ट या कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सध्या आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
- राजेश कुमार सिंह, एस.पी., हरदा

 

बातम्या आणखी आहेत...