1200 स्क्वेअर फूट / 1200 स्क्वेअर फूट जागेसाठी महिलेला विवस्र करून बेदम मारहाण, पीडित महिला होमगार्ड पदावर करते काम

दिव्य मराठी वेब टीम

Feb 22,2019 03:55:00 PM IST

औरंगाबाद- 1200 फूट जागेवरून झालेल्या वादातून एका महिलेला विवस्र करून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, ही गेल्या महिन्यातील घटना असून, आता या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

सिल्लोड तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. पीडित महिला सिल्लोड ग्रामीण पोलिसांकडे होमगार्ड पदावर काम करते. तिच्या आईच्या नावावर असलेल्या जागेवर तिच्या चुलत्यांचा डोळा आहे. त्यामुळे पीडित महिला आणि तिच्या वयोवृद्ध आईला तिथून पिटाळून लावण्यासाठी आरोपी धनंजय वाघ, मुरलीधर वाघ, बाबुराव वाघ आणि रामदास वाघ यांनी पीडितेला विवस्र करुन बेदम मारहाण केली. विवस्र पीडितेच्या मदतीसाठी पुढे आलेल्या गावकर्‍यांनीही आरोपींनी पिटाळून लावले होते.या प्रकरणी सिल्लोड पोलिस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

X
COMMENT