Home | Khabrein Jara Hat Ke | lady was so worried about breaking wind non-stop it ruined my love life

15 वर्षांपासून पोटाच्या समस्येने त्रस्त होती महिला, यामुळे झाले ब्रेकअप; डॉक्टरही ठरले अपयशी, मग मित्राच्या सल्ल्याने झाला चमत्कार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 02:07 PM IST

जेवण करताच गॅस तयार होऊन तिचे पोट फुगत होते.

 • lady was so worried about breaking wind non-stop it ruined my love life

  ब्लॅकहीथ - लंडनमध्ये राहणारी महिला 15 वर्षांपासून पोटाच्या वेदनेने ग्रस्त होती. कालांतराने त्याचे साइड इफेक्ट देखील समोर आले. काही खाल्ल्यानंतर तिच्या पोटात भयंकर गॅस तयार होऊन पोटावर सूज येत होती. गॅस पास न केल्याशिवाय ती राहू शकत नव्हती. यामुळे तिचे बाहेरचे खाणे-पिणे पूर्णपणे बंद झाले होते. याच कारणामुळे तिची लव्ह लाईफ उद्ध्वस्त झाली. तिने अनेक डॉक्टरांकडून उपचार घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, काहीच फायदा झाला नाही. शेवटी मित्राच्या सल्ल्यानुसार तिचे आयुष्य बदलले.

  - लंडनजवळील ब्लॅकहीथमध्ये राहणाऱ्या इंटीरिअर डिझायनर एमा फ्रॉस्ट (30) ही कथा आहे. ती गेल्या 15 वर्षांपासून पोटाच्या वेदनेने ग्रस्त होती. डॉक्टरांच्या मते तिला सेलियाक रोगाने ग्रासले होते. ज्यामुळे तिचे आतडे कमकुवत झाले होते. त्यामुळे तिला वारंवार पोटात वेदना होत होत्या.
  - आजारपणामुळे पोट इतके संवेदनशील झाले की अन्न खाल्यानंतर लगेच सूज येऊन पोट फुगत होते. यानंतर सतत गॅस पास होत होती. तिला असे वाटत होते की कोणीतरी बॉलमध्ये हवा भरून तिच्या पोटात ठेवले आहे.
  - वारंवार गॅस पास होत असल्यामुळे आणि शौचालयाला जाण्यामुळे तिला खूप खजील वाटत होते आणि यामुळेच तिचे लव्ह लाईफही संपले. तिने मित्रांसोबत बाहेर खाणे-पिणे देखील थांबविले.


  मित्राच्या सल्ल्याने बदलले जीवन

  - उपचारादरम्यान, एमाने तिच्या आहारात दुग्धाळ पदार्थ घेणे थांबवले पण यामुळे मदत झाली नाही. यानंतर तिने गहू आणि ग्लूटेन खाणे थांबविले. त्याचा काही प्रमाणात परिणाम देखील झाला. परंतु पोटाच्या वेदना कमी झाल्या नाही.

  - दरम्यान, तिच्या एका मित्राने तिला LQ नावाचे हेल्थ लिक्विड सप्लीमेंट घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या औषधांमुळे एमाला फायदा होत नव्हता. अशातच, तिने मित्राच्या सल्ल्यानुसार लिक्विड घेण्यास सुरुवात केली.

  - काही दिवसांत लिक्विडचा परिणाम दिसून आला आणि एम्मा पूर्णपणे बरी झाली. लिक्विडमुळे तिची पाचनशक्ती चांगली झाली. यानंतर तिने मित्रांसोबत फिरायला जाण्यास आणि नवीन जोडीदार शोधण्यास सुरुवात केली. लवकरच तिचा शोध पूर्ण झाला आणि आता ती तिच्या नवीन प्रियकरासोबत खूप आनंदी आहे.

Trending