आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनी अमावास्येनिमित्त शिंगणापुरात लाखो भाविकांचे दर्शन, 3 ते 4 वर्षांतील गर्दीचा उच्चांक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई / टाकळी अंबड - भारतातील साडेतीन पीठांपैकी एक मुख्य पीठ असलेले गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र राक्षस भुवन येथील शनी मंदिरात शनिवारी अमावास्येनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू हून भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात हजारो भाविकांनी शनी महाराजांचे दर्शन घेतले.

 

देशभरात शनीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. यामध्ये गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन येथील शनी मंदिर हे पूर्ण पीठ आहे, तर बीड शहरातील मोंढा भागातील शनिमंदिर अर्धे पीठ म्हणून प्रसिद्ध आहे. शनिवारी आलेल्या अमावास्येनिमित्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी या दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी केली होती. राक्षस भुवनमध्ये मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली हाेती. तर यात्रेच्या अनुषंगाने पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.नारळ, तेल व प्रसाद विक्रेत्यांनीही मोठी गर्दी केली होती. लांब दर्शनरांगा लागल्या होत्या. राज्य व परराज्यातूनही भाविक आले होते. राज्य परिवहन महामंडळाने बीड, गेवराई व माजलगाव आगाराूतन ज्यादा बसेस सोडल्या होत्या. अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांनीही भेट देऊन दर्शन घेत सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. गेवराई व चकलांबा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

तीन तास वाहनकोंडी
दरम्यान, अरुंद रस्ते व भाविकांची मोठी गर्दी झाल्याने राक्षस भुवन रस्त्याला मोठी वाहनकोंडी झाली होती. तब्बल तीन तास वाहनधारकांना वाहन कोंडीचा त्रास सहन करावा लागला. सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी व सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

 

बीडमध्येही गर्दी
दरम्यान, बीड येथील मोंढा परिसरातील शनी मंदिर हे साडेतीनपैकी अर्धे पीठ म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. या मंदिरातही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर देवस्थानच्या वतीने अभिषेक व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

 

बातम्या आणखी आहेत...