आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कँसर असूनही आयुष्मानच्या पत्नीने केला रँप वॉक, बाल्ड लूकमध्येही चेह-यावर होता कॉन्फिडेंस : Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. आयुष्मान खुरानाची पत्नी आणि शॉर्ट फिल्म डायरेक्टर ताहिरा कश्यपने लॅक्मे फॅशन वीकमध्ये रँप वॉक केला. विशेष म्हणजे ताहिरा कँसरचा सामना करतेय. ती बाल्ड लूकमध्ये पुर्ण कॉन्फिडेंसमध्ये रँपवर अवतरली. लूक सनग्लासेस आणि नॉन-ट्रेडिशनल ड्रेसमध्ये ताहिरालापाहून लोकांनी तिची स्तुती केली. ताहिराने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की - "हा अनुभव खुप सुंदर होता. मी पहिल्यांदा रँपवर उतरले आणि रँपवर उतरल्यावर कसे वाटते हे जाणून घेण्याची मला खुप इच्छा होती. खरंच हा अनुभव माझ्यासाठी खुप चांगला होता."

 

शोच्या प्रोड्यूसर्सने केली ताहिराच्या कॉन्फिडेंसची स्तुती 
शोच्या प्रोड्यूसर्सने ताहिराची स्तुती करत लिहिले की, - "ताहिराने आपल्या आयुष्यात अनेक भूमिका निभावल्या. रेडियो स्टेशन प्रोग्रामिंग हेडपासून थियेटर रायटर, डायरेक्टर, लेखक, मास कम्युनिकेशन टीचर आणि शॉर्ट फिल्ममेकरपर्यंत तिने प्रत्येक भूमिका उत्तमरित्या बजावली. आम्ही तिच्या डेब्यू रँप वॉकची स्तुती करतो आणि आशा आहे की, यापुढेची त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल." ताहिराने काही महिन्यांपुर्वी तिला कँसर असल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते. ताहिराला या आजाराविषयी कळाले त्यादरम्यान आयुष्मान 'अंधाधुन' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. 

बातम्या आणखी आहेत...