Sangali flood / लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले 25 लाख रुपये

भाविकांनी अंबाबाईला नेसवलेल्या 5 हजार साड्या पूरग्रस्त महिलांना देणार 
 

प्रतिनिधी

Aug 14,2019 02:33:00 PM IST

मुंबई - सांगली-कोल्हापूरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे सरसावत आहेत. विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, राजकीय तसेच चित्रपटसृष्टीतील व्यक्ती मदत करत आहेत. अशातच आता राज्यातील विविध देवस्थानांकडून पुरग्रस्तांसाठी मदत जाहीर होत आहे. मुंबईच्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने पूरग्रस्तांसाठी 25 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी 5 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. भाविकांनी अंबाबाईला नेसवलेल्या 5 हजार साड्या महिलांना देण्यात येणार आहे. मुंबईच्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महाराष्ट्रात आलेल्या महापूरामुळे कराव्या लागणाऱ्या पुनर्वसानासाठी 25 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे. यापूर्वी शिर्डी संस्थानाने पुरग्रस्तांसाठी 10 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.

X
COMMENT