आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालूंना रुग्णालयाचे जेवण बंद; बाहेरचे जेवल्याने साखर वाढली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- रिम्सच्या पेइंग वॉर्डात दाखल असलेले राजद प्रमुख लालूप्रसाद यांना रुग्णालयातील जेवण देणे बंद करण्यात आले आहे. अाता त्यांना बाहेरचा डबा येतो. त्यामुळे डाएट चार्ट  फॉलो होत नाही. यामुळे साखरेची पातळी वाढते आहे. रविवारी त्यांची फास्टिंगची शुगर लेव्हल १८५ वर गेली होती. यामुळे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर चिंतेत आहेत. डॉ. प्रसाद यांनी सांगितले, त्यांना ११ प्रकारचे आजार आहेत. त्यांना आताच केसतोड झाल्याने आणखी समस्येत वाढ झाली आहे. जर साखर नियंत्रणात राहिली नाही तर जखम लवकर नीट होणार नाही. 


अाता डॉक्टर रिम्स व्यवस्थापन व तुरुंग प्रशासनाशी बोलणार आहेत. एक तर पेइंग वॉर्डात दाखल झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून जेवण देण्याची सुविधा नाही. जेवण व औषधांची सोय स्वत:लाच करावी लागते. पेइंग वॉर्डात शिफ्ट झालेल्या लालूंना  बरियातू येथील एका निकटवर्तीयाच्या घरचे जेवण येते. त्यांचा सेवेकरी लालूंच्या अावडीचे भोजन आणतो. लालूप्रसाद भाकरीऐवजी भात जास्त खात आहेत, तर हिरव्या भाज्या खाण्याऐवजी बटाट्यांच्या भाजीवर ताव मारत आहेत. हेच त्यांचे रक्तातील साखर वाढण्याचे कारण आहे. रिम्सच्या आहारतज्ज्ञ मीनाक्षीकुमार म्हणाल्या, पेइंग वॉर्डात जेवण देण्याचा नियम नाही. परंतु त्यांना डाएट चार्ट देण्यात आला आहे. त्यानुसार त्यांनी जेवण करावे. अाता ते काय खातात, याची माहिती नाही. तर रिम्सचे अधीक्षक डॉ. विवेक कश्यप म्हणाले, लालूंच्या डाएटकडे लक्ष देणे डॉक्टर व आहारतज्ज्ञाचे काम आहे. तसे होत नसेल तर मला शोध घ्यावा लागेल. 


या आधी लालूप्रसाद यादव मुंबईत उपचारासाठी आले होते. मुंबईतच राहण्याची त्यांची इच्छा होती. पण उच्च न्यायालयाने तंबी दिल्यानंतर लालू पाटण्यात दाखल झाले. पाटण्यात त्यांच्यावर रिम्समध्ये उपचार सुरू असून, आधीच्या वॉर्डात  त्यांनी राहण्यास नकार दिला. कुत्र्यांच्या भुंकण्याने आपली झोपमोड होत असल्याचे कारण दिले होते. तुरुंग प्रशासन व रिम्स व्यवस्थापनाने त्यांना पेइंग वॉर्डात पैसे भरून राहण्याची परवानगी दिली. 

बातम्या आणखी आहेत...