Home | National | Other State | Lalu Prasad Yadav facing depression and many other health issues

लालुंना डिप्रेशन, पायाला केसतोडच्या जखमेमुळे चालण्यास त्रास, मेडिकल बुलेटिन जारी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 08, 2018, 02:43 PM IST

पायाला केसतोड झाल्याने सूज आली आहे. त्यामुळे लालुंना चालायला त्रास होत आहे. शुक्रवारी त्यांना उभेही राहता येत नव्हते.

 • Lalu Prasad Yadav facing depression and many other health issues

  रांची - चारा घोटाळा प्रकरणामध्ये शिक्षा उपभोगणारे राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. सध्या रिम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. रिम्सचे डायरेक्टर डॉ. आरके श्रीवास्तव यांनी लालू यादव यांचे मेडिकल बुलेटिन जारी केले. ते म्हणाले की, लालुंच्या शरिरात व्हिटामिन डी थोडे कमी आहे. त्यांच्या पायाला केसतोड झाल्याने सूज आली आहे. त्यामुळे त्यांना चालायला त्रास होत आहे. शुक्रवारी दिवसभर त्यांना उभेही राहता येत नव्हते.


  डॉ. उमेश यांनी एशियन हार्ट इन्स्टिट्यूटबरोबल लालुंच्या ट्रिटमेंटबाबत चर्चा केली आहे. शुक्रवारी झालेल्या टेस्टमध्ये जे काही समोर आले होते, त्याबाबतही सल्ला घेण्यात आला आहे. डॉक्टरांच्या निर्देशानुसार लालुंना सध्या डिस्चार्ज देता येणे शक्य नाही. तपासण्यामध्ये त्यांचा बीपी आणि शुगर लेव्हलही वाढलेली दिसत आहे. ईसीजी रिपोर्टमध्येही काही फरक असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांना रिम्सच्या कार्डियॉलॉजी वार्डमधून पेइंग वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.


  डिप्रेशनसाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी करणार
  - लालुंचा मेडिकल रिपोर्ट रिम्सने बिरसा मुंडा तुरुंग अधीक्षकांकडे पाठवला आहे. रिपोर्टमध्ये लालूंना इतर आजारांबरोबरच डिप्रेशनचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या पक्तात अजूनही इन्फेक्शन आहे. पायाला जखम झाल्याने सूज आलेली आहे.


  लालुंचा रिपोर्ट
  हिमोग्लोबीन 10.6
  बीपी 150/80
  पल्स 80 प्रति मिनिट
  चेस्ट क्लियर
  न्यूट्रोफिल्स 76
  ब्लड शुगर (फास्टीग) 135
  ब्लड शुगर(पीपी) 196
  व्हिटामिन डी 16.3
  टोटल काउंट 12,500


  लालुंना भेटायला पोहोचले जीतन राम मांझीचे पुत्र...
  शुक्रवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचे पुत्र प्रवीण कुमार रिम्सला लालुंची भेट घेण्यासाठी पोहोचले. ते म्हणाले की, लालुंची स्थिती फार चांगली नाही. त्यांना बसता येत नाही. ते बेडवर लोटून आहेत. राज्यसभा खासदार अखिलेश सिंह यांनी रिम्सला पोहोचून लालुंची भेट घेतली.

Trending