आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालू यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे न्यायालयात राहिले गैरहजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - रेल्वे टेंडर घोटाळा प्रकरणात सोमवारी दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयात सुनावणी झाली. त्या वेळी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि त्यांचे पुत्र तेजस्वी हजर झाले. लालूप्रसाद यादव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहणार होते, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. त्यांना २० डिसेंबरला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.   


या प्रकरणात न्यायालयात याआधी ६ ऑक्टोबरला सुनावणी झाली होती. त्या वेळी न्यायालयाने राबडीदेवी, तेजस्वीसह १४ आरोपींना जामीन देताना १९ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली होती. 
असा आहे आयआरसीटीसी घोटाळा :२००४ ते २००९ यादरम्यान लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना एका खासगी कंपनीला अवैधरीत्या भुवनेश्वर आणि रांची येथे दोन हॉटेल चालवण्याचे कंत्राट दिले, त्या बदल्यात या कंपनीने त्यांना पाटणा येथील सगुणा वळण भागात या ३ एकर जमीन दिली होती, असा आरोप भारतीय रेल्वे पर्यटन आणि खानपान मंडळ (आयआरसीटीसी) घोटाळ्यात लालूंवर आहे. या प्रकरणात सीबीआयने लालू यादव, राबडीदेवी, तेजस्वी यादवसह १४ लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.   

 

चारा घोटाळा सुनावणीतही गैरहजर
प्रकृती बरी नसल्यामुळे लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्यातील खटल्याच्या सुनावणीलाही गैरहजर राहिले. सीबीआयसमोर सोमवारी हा खटला सुरू आहे. हे प्रकरण १९९० मध्ये दोरंदा कोषागारातून १३९.३५ कोटी रुपयांच्या अपहरणाशी संबंधित आहे. 

बातम्या आणखी आहेत...