आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Land Acquisition Barriers To Thirteen Railway Projects Across The State; The Works Are Laid Out

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यभरातील तेरा रेल्वेे प्रकल्पांना भूसंपादनाचे अडथळे; कामे रखडली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली : राज्यातील रेल्वेे विभागाच्या तेरा प्रकल्पांना एक हजार ४६० हेक्टर जमीन संपादनाची प्रतीक्षा असून जमीन संपादनाचे काम संथगतीने होत असल्याने रेल्वेे प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्यास अडथळे निर्माण होऊ लागले आहेत.

राज्यात रेल्वेे विभागातर्फे नवीन तेरा प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी शासकीय, खासगी व वन विभागाची जमीन संपादित करावी लागत आहे. त्‍यानुसार रेल्वेे विभागाने संपादित जमिनीबाबतचा सविस्तर अहवाल रेल्वेे विभागाच्या मुख्य प्रशासनिक अधिकाऱ्यांना पाठवला होता. यामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, पुणे, सांगली, सातारा, बीड, हिंगोली, नांदेड, वर्धा, यवतमाळ व नागपूर या जिल्ह्यातील जमीन संपादनाबाबत अडचणी असल्‍याचे नमूद केले आहे.

या नवीन तेरा प्रकल्पांसाठी खाजगी जमीन संपादित झाली असली तरी व इतर विवादित जमीन संपादित होणे बाकी आहे. त्यामुळेे प्रकल्प गतीने पूर्ण करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

यामध्ये अहमदनगर, बीड, परळी या प्रकल्पासाठी अहमदनगर येथील सव्वासहा हेक्टर तर बीड जिल्ह्यातील २४७ हेक्टर जमीन संपादित करणे बाकी आहे. वर्धा, नांदेड रेल्वेे प्रकल्पासाठी वर्धा जिल्ह्यातील ४६, यवतमाळ २१२, हिंगोली २४, तर नांदेड जिल्ह्यातील २५६ हेक्टर जमीन संपादित होणे बाकी आहे. बारामती, लोण मार्गासाठी सातारा जिल्ह्यातील ४४ तर पुणे जिल्ह्यातील १८० हेक्टर, कल्याण-कसारा तिसऱ्या रेल्वेेलाइनसाठी ठाणे जिल्ह्यातील ३६ हेक्टर, वर्धा-नागपूर तिसऱ्या रेल्वेेलाइनसाठी वर्धा जिल्ह्यातील दोन हेक्टर, वर्धा-बल्लारशा तिसऱ्या लाइनसाठी वर्धा जिल्ह्यातील ७५ हेक्टर, इटारसी- नागपूर तिसऱ्या लाइनसाठी नागपूर जिल्ह्यातील सतरा हेक्टर, पुणे-मिरज दुहेरीकरणासाठी सातारा जिल्ह्यातील तेवीस हेक्टर, पुणे तेरा हेक्टर, सांगली तीन हेक्टर जमीन संपादित करणे बाकी आहे. तसेच दौंड-मनमाड दुहेरीकरणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील १५७ हेक्टर, पुणे सोळा हेक्टर, औरंगाबाद जिल्ह्यातील सात हेक्टर, नाशिक जिल्ह्यातील ४५ हेक्टर जमीन संपादित होणे बाकी आहे.

मनमाड-जळगाव तिसऱ्या लाइनसाठी नाशिक जिल्ह्यातील दोन हेक्टर व जळगाव जिल्ह्यातील अकरा हेक्टर जमीन संपादित होणे बाकी आहे. वर्धा-नागपूर चौथ्या लाइनसाठी वर्धा जिल्ह्यातील दहा हेक्टर, नागपूर पंधरा हेक्टर तर जळगाव भुसावळ चौथ्या लाइनसाठी जळगाव जिल्ह्यातील सहा हेक्टर, तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स ते कुर्ला पाचव्या व सहाव्या लाइनसाठी एक हेक्टर जमीन संपादित होणे बाकी आहे.

जिल्हा प्रशासनाशी संपर्क

आता या जमीन संपादनातील अडचणी सोडवण्यासाठी राज्याच्या महसूल व वन विभागाने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय वन विभागाच्या जमीन संपादनासाठी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला जात आहे. सध्या तरी जमीन संपादनामध्ये रेल्वेे प्रकल्पाची कामे संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.
 

बातम्या आणखी आहेत...