आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्येत ४ पट वाढल्या जमिनीच्या किमती; रजिस्ट्रीत झाली तब्बल २० टक्क्यांनी वाढ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजय उपाध्याय 

लखनऊ - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर निर्माण आणि विकास योजनांच्या अपेक्षेमुळे जमिनीचे भाव आकाशाला भिडले आहेत.


अयोध्यानगरीच्या जवळ असलेल्या ग्रामीण भागात जमिनीच्या किमती चौपट वाढल्या आहेत. अयोध्येला जोडणारा बायपास आणि रस्त्याला लागून असलेल्या जमिनींच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. लखनऊ आणि देशातील संपूर्ण भागातून व्यावसायिक स्थानिक लोकांशी संपर्क साधत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या सदर तहसीलचे उपनिबंधक एस. बी. सिंह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर १२ नोव्हेंबरपासून जमिनीच्या खरेदीला वेग आला आहे. एवढेच नाही तर रजिस्ट्रीमध्येही २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.लोक आधीपेक्षा जास्त किंमत देऊन जमीन खरेदी करण्यास तयार आहेत. मात्र मोठ्या आकाराच्या जमिनींची खरेदी-विक्री करण्यास सध्या कोणी तयार नाही. राज्य सरकार कुठे आणि किती जमीन अधिग्रहित करणार हे स्पष्ट नाही हे त्याचे कारण आहे. वास्तविकत: अधिग्रहणाच्या वेळी किमान किंमत त्या वेळी झालेल्या रजिस्ट्रीच्या किमतीच्या सरासरीच्या आधारे निश्चित केली जाते, तर कमाल किंमत सर्कल रेटच्या चारपट असू शकते. म्हणजे सरकार अधिग्रहण करताना सर्कल रेटपेक्षा चारपट जास्त भरपाई देते. महाग जमीन खरेदी केल्यानंतर जर जमिनीचे अधिग्रहण सरकारने केले तर नुकसानच होऊ शकते. त्यामुळे जेव्हा सरकारच्या विकास योजनांना अंतिम स्वरूप येईल तेव्हाच मोठ्या जमिनींचे सौदे होतील, अशी शक्यता आहे. उपनिबंधक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येच्या सर्वात जवळ मांझा बरेहटा, सहजनवा, सहजनवा उपरहा, माझा उपरहा ही चार गावे आहेत. ती शरयू नदीच्या किनाऱ्यावर आहेत. राज्य सरकार भगवान श्रीरामाची २५१ फूट उंचीची मूर्ती उभारण्यासाठी माझा जमथरा गावातील जमीन खरेदी करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी १२५ कोटी रुपये एवढी रक्कम प्रकल्पाचे नोडल अधिकारी विभागीय पर्यटन अधिकाऱ्याकडे आली आहे. पण अंतिम निर्णय अद्याप न झाल्याने जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. विमानतळासाठी १०० हेक्टर जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली आहे.महर्षी महेश योगी संस्थेकडे ३०० एकर जमीन

अयोध्येत १९९१ मध्ये वैदिक विद्यापीठासह सर्व योजना घेऊन आलेल्या महर्षी महेश योगी संस्थेकडे जवळपास ३०० एकर जमीन असावी असा अंदाज आहे. संस्थेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मते, श्रीराम वैदिक विद्यापीठाच्या योजनेवर विचार होत आहे. संस्थेशी संबंधित सर्व जमीन काही वर्षांत विकण्यात आली आहे.बातम्या आणखी आहेत...