आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३० वर्षांत प्रथमच काश्मिरात लँडलाइन बंद, लडाखचे लाेक जल्लाेषासाठी उतरले रस्त्यावर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर -  इकडे काश्मीरबाबत सर्वात माेठा निर्णय हाेत असताना जम्मू ते श्रीनगरदरम्यान जमावबंदी (कलम १४४) लागू केली हाेती. काश्मिरात इंटरनेट बंद करणे काही नवीन नाही. मात्र ३० वर्षांनंतर या भागात प्रथमच इंटरनेटसाेबत  माेबाइल फाेन, ब्राॅडबॅन्ड इंटरनेट व लँडलाइनही बंद केले हाेते.  काश्मीरचा जगाशी संपर्क तुटला हाेता. सॅटेलाइट फाेन व आेबी व्हॅनद्वारेच काश्मीरमधील घडामाेडी बाहेर कळू शकत हाेत्या. ४ आॅगस्टपासूनच रस्ते सुनसान हाेते. एखाद- दुसरी रुग्णवाहिका किंवा रुग्णालयाची गाडी तेवढी रस्त्यावर दिसायची.  जम्मू-काश्मिरातील शाळा, काॅलेजेस बंद हाेते. बाजारपेठाही बंद हाेत्या. रस्त्यावर फक्त लष्करी जवानांची गस्त हाेती. लाेकांनी घरात दाेन महिन्यांचे आवश्यक सामान भरून ठेवले आहे. सुरक्षा दलाच्या कडेकाेट बंदाेबस्तामुळे कुठेही हिंसाचाराची घटना नाही की आंदाेलनाची बातमी नाही. श्रीनगरच्या अतिसंवेदनशील भागात लाेकसंख्येपेक्षा दीड पटीने जास्त सुरक्षा जवान तैनात केले आहेत. लष्कराच्या सूचनेनंतर पर्यटकांनीही काश्मीर खाेऱ्यातून काढता पाय घेतलाय. मागील ४८ तासांत १८ हजाराहून अधिक पर्यटकांनी हा भाग साेडला. आता काश्मीर खाेऱ्यात बाहेरचा एकही पर्यटक राहिलेला नाही. संसदेत घाेषणेनंतर प्रमुख नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र फुटीरतावादी व त्यांच्या समर्थकांचे मात्र माैन हाेते. तिकडे काश्मीरपासून वेगळ्या झालेल्या लडाखमध्येही ना इंटरनेट बंद हाेते ना फाेन. कारगिल व लेहमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.  लेहचे राजकीय नेते, धार्मिक नेत्यांनी निर्णयाचे स्वागत केले तर कारगिलमध्ये मात्र असंताेष दिसून आला. लडाखच्या २.५ लाख लाेकसंख्येपैकी १.२५ लाख लाेक लेहमध्ये राहतात. बाहेरचे लाेक येण्याची स्थानिकांना भीती आहे. हिमाचल प्रदेश व उत्तराखंडप्रमाणे इथेही बाहेरील लाेकांना भूखंड खरेदीस सरकारने मज्जाव करावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.